फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्याची सुरुवात म्हणजे आषाढ मासारंभ. हा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यापासून पावसाची सुरुवात, शेतीची काम आणि अनेक धार्मिक व्रत उपवास सुरू होतात. मात्र या महिन्यात विवाह, ग्रहप्रवेश, मूंज, वास्तूशांती यांसारखे शुभ कार्य साधारणपणे टाळले जातात. यामागे धार्मिक आणि ऋतूमानाची संबंधित आणि सामाजिक देखील काही कारणे आहे. आषाढ महिन्यात शुभ कार्य का टाळली जातात, जाणून घ्या
आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार ते झोपेत असल्यामुळे नवीन शुभ कार्यांना त्यांचा आशीर्वाद लाभत नाही त्यामुळे विवाह, ग्रहप्रवेश, मुंज यांसारखे मंगल कार्य पुढे ढकलले जाते. आषाढ ते कार्तिक हा मास चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या चार महिन्यांमध्ये संत, साधू आणि वारकरी अधिकाधिक पूजा, जप, तप या साधनेवर भर देतात म्हणून हा काळ उत्सव साजरे करण्यापेक्षा आत्मचिंतनासाठी योग्य मानला जातो, ही आहे धार्मिक मान्यता.
असे देखील म्हटले जाते की, हा काळ पावसाचा असतो. पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती. पावसामुळे रस्ते चिखलमच होईचे. नद्या दुथडी भरून वाहत असायच्या त्यामुळे प्रवास धोकादायक व्हायचा. अशावेळी विवाह किंवा इतर मोठ्या समारंभांसाठी दूरवर येणाऱ्या पाहुण्यांना अडचणी येऊ नये म्हणूनच या काळात शुभ कार्य टाळण्याची प्रथा ठरली. शिवाय आषाढ हा पेरणीचा महिना आहे. शेतकऱ्यांसाठी हा वर्षातील सर्वांत महत्त्वाचा काळ असतो.
जर या काळात विवाह किंवा मोठे समारंभ झाले तर शेतीची कामं मागे पडू शकतात. म्हणूनच समाजाने शेतीला प्राधान्य देण्यासाठी शुभ कार्य पुढे ढकलली. तर आरोग्याच्या दृष्टिकोनाने पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाचे त्रास आणि हवामानातील बदल अधिक असतात. मोठ्या मेजवाण्या किंवा गर्दीचे कार्यक्रम आरोग्यासाठी जोखमीचे ठरू शकतात. यामुळेही या काळात मोठे समारंभ टाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी.
मग प्रश्न उरतो तो आषाढ महिना अशुभ आहे का? तर नाही आषाढ महिना अशुभ मानला जात नाही उलट आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातच आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असते. पंढरपूरची वारी पूर्ण होते. भगवान विष्णू, विठ्ठल आणि महादेवांची उपासना केली जाते. दान, जप, तप, व्रत, पारायण आणि नामस्मरणाला या काळात विशेष महत्त्व दिले जाते. म्हणजेच आषाढ महिना शुभ कार्यासाठी नव्हे तर शुभ विचार, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी राखून ठेवलेला महिना आहे असं म्हणायला हरकत नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखी मंगलकार्ये चातुर्मास संपेपर्यंत टाळली जातात.
Ans: आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा चार महिन्यांचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. हा काळ जप, तप, व्रत आणि भक्तीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.
Ans: नाही. आषाढ महिना अशुभ नसून अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णू, विठ्ठल आणि महादेव यांच्या उपासनेला विशेष महत्त्व असते.






