Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadha Amavasya: कधी आहे आषाढ अमावस्या, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि पितृपूजेचे महत्त्व

आषाढ अमावस्या बुधवार, १२ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी ही अमावस्या श्रावण महिन्याच्या आगमनाची चाहूल देणारी मानली जाते. अमावस्येचा दिवस पूर्वजांची प्रार्थना करण्यासाठी शुभ मानला जातो. आषाढ अमावस्या कधी आहे आणि पितृपूजेचे महत्त्व काय आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ अमावस्या कधी आहे
  • आषाढ अमावस्येला पितृपूजेचे महत्त्व
  • आषाढ अमावस्येला काय करावे
 

हिंदू धर्मात आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही तिथी पूर्वजांना समर्पित केलेली आहे. या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच पितरांचे तर्पण, श्राद्ध देखील केले जाते. यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा राहते आणि पितृदोष देखील दूर होतो अशी श्रद्धा आहे. या दिवशी दानधर्म करणे व पवित्र नदीत स्नान करणे, अध्यात्मिक व धार्मिक कार्ये करणे तसेच ध्यान धारणा करणे, पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच, आषाढ अमावस्येला गोर गरिबांना किंवा ब्राम्हणाला दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. याशिवाय हा दिवस काही खास ज्योतिष उपायांसाठी विशेष मानला जातो.

आषाढ अमावस्या मुहूर्त

पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीची सुरुवात मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून ५३ मिनिटांनी होत आहे आणि अमावस्येची समाप्ती १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे आषाढ अमावस्या यंदा बुधवार, १२ ऑगस्ट रोजी असेल. यामुळे पितृ कर्माशी संबंधित कामे १२ ऑगस्ट रोजी करावी आणि याच दिवशी नदीत स्नान आणि दान करणे देखील शुभ राहील.

Shravan 2026: 13 ऑगस्टपासून सुरू होतो श्रावण; 4 सोमवारांचे धार्मिक महत्त्व आणि शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा

आषाढ अमावस्येचे धार्मिक महत्त्व

आषाढ अमावस्या ही पितरांना समर्पित असलेली तिथी मानली जाते. या दिवशी पितृदेवतांना तर्पण आणि पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच पितृदोष कमी होण्यासाठीही या दिवसाचे विशेष महत्त्व सांगितले जाते.

आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्याने हा दिवस आध्यात्मिक शुद्धीकरण आणि नवीन धार्मिक पर्वाची तयारी म्हणूनही महत्त्वाचा मानला जातो.

पितृपूजेचे महत्त्व

आषाढ अमावस्येला पितरांचे स्मरण करून केलेले तर्पण अत्यंत फलदायी मानले जाते. धर्मग्रंथांनुसार या दिवशी श्रद्धेने केलेल्या पितृसेवेने कुटुंबावर पितरांची कृपा राहते आणि घरातील सुख-समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.

आषाढ अमावस्येला काय करावे?

सकाळी लवकर उठून पवित्र नदी, तलाव किंवा घरी स्नान करावे.

Guru Charitra: श्री गुरुचरित्रात एकूण किती अध्याय आहेत? जाणून घ्या ग्रंथाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांसाठी तर्पण करावे.

भगवान शिव, भगवान विष्णू आणि दत्तगुरूंची पूजा करावी.

गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, धान्य किंवा दक्षिणेचे दान करावे.

पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी.

दिवसभर सात्त्विक आहार घ्यावा आणि शक्य असल्यास उपवास करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ अमावस्या म्हणजे काय?

    Ans: आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या म्हणतात. हा दिवस पितृपूजा, तर्पण आणि दानधर्मासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.

  • Que: आषाढ अमावस्येला पितृपूजा का केली जाते?

    Ans: या दिवशी पितरांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि पितृदोष कमी होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • Que: आषाढ अमावस्या आणि श्रावण महिन्याचा काय संबंध आहे?

    Ans: आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस श्रावणातील धार्मिक उपासना आणि शिवभक्तीची पूर्वतयारी मानला जातो.

Web Title: Ashadha amavasya 2026 when is the ashadh amavasya muhurta method of worship and importance of pitru puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • amavasya
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
1

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
2

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.