फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिना दान करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. यावेळी लक्ष्मी नारायणासोबत गुरुंची देखील पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्थान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. यंदा आषाढ पौर्णिमा गुरुवार, 10 जुलै रोजी आहे. यावेळी काही कामे करणे निषिद्ध मानले जाते. आषाढ पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करु नये, जाणून घ्या.
मान्यतेनुसार, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमेचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. महाभारत रचणारे महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यालाच व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, वेदव्यासांनी चार वेदांची रचना केली. यावेळी गुरु त्यांच्या शिष्यांना दीक्षा देतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वजण गुरुंची पूजा करतात.
पंचांगानुसार, आषाढ पौर्णिमा गुरुवार, 10 जुलै रोजी पहाटे 2.43 वाजता सुरुवात होत आहे. या पौर्णिमेची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 11 जुलै रोजी पहाटे 1.53 वाजता होईल. उदयतिथीनुसार, गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुवार, 10 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.
आषाढ पौर्णिमेच्या दिवशी केस आणि नख कापू नये. असे म्हटले जाते की, केस आणि नख कापल्यास शरीराची रचना ही मृत अवयवांसारखी होते म्हणून पौर्णिमेला या गोष्टी करणे टाळावे अन्यथा देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो.
पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगांचे कपडे परिधान करु नये. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचबरोबर व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होऊ शकतो.
पौर्णिमेच्या दिवशी वडीलधाऱ्यांचा अनादर करु नये. त्याचसोबत महिलांशी गैरवर्तन करु नये. असे केल्यास पितृदोष उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे व्यक्तीला जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अन्यथा जीवनात दुर्दैव येते. तसेच या दिवशी घरामध्ये घाण ठेवू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. त्याचसोबत धनाची लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते.
आषाढ पौर्णिमेला घरामध्ये भांडणे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यामुळे घरामध्ये शांतीचे वातावरण राहील. जर तुमच्यावर देवी लक्ष्मी नाराज झाल्यास तु्म्हाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)