Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashtavinayaka: कोण आहे सिद्धटेकचा सिद्धीविनायक जाणून घ्या या मंदिराचे वैशिष्ट्य

अष्टविनायकांपैकी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान सिद्धीविनायक मंदिर सिद्धटेक. या मंदिराला विशेष स्थान असून येथे विराजमान असलेले सिद्धीविनायक गणपती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे मानले जातात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 31, 2026 | 12:32 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सिद्धटेकचा सिद्धीविनायक मंदिर
  • सिद्धीविनायक मंदिराचे वैशिष्ट्य
  • सिद्धीविनायक मंदिराचे पौराणिक महत्त्व
 

सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले पवित्र ठिकाण आहे. येथे असलेला सिद्धीविनायक गणपती अष्टविनायक यात्रेतील दुसरे मंदिर मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून सिद्धीविनायक प्रसिद्ध आहे. विशेषतः कार्यसिद्धीसाठी येथे भाविक मोठ्या श्रद्धेने येतात.

सिद्धी देणारा शक्तिशाली गणपती

सिद्धटेक सिद्धीविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक अतिशय पवित्र गणपती मंदिर आहे. हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यामधील सिद्धटेक गावात भीमा नदीच्या काठावर बसलेले आहे. मंदिर टेकडीच्या पायथ्याशी बसलेले असून भोवती सुंदर असा निसर्ग आहे. सिद्धटेकचा गणपती हा सिद्धीविनायक म्हणून ओळखला जातो. म्हणजेच इच्छा पूर्ण करणारा आणि सिद्धी देणारा गणपती. अष्टविनायकापैकी एकमेव मंदिर जेथे गणपतीची सोंड उजवीकडेच म्हणजे दक्षिणमुखी आहे. हे अत्यंत शक्तिशाली रुप मानलं जातं. त्याची पूजा करणं देखील तितकच कठीण असतं.

Zodiac Sign: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार वरिष्ठ योग, या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

ऐतिहासिक आणि पवित्र मंदिर

येथील मंदिर दगडी बांधकामात असून त्याची रचना साधी पण प्राचीन शैलीची आहे. भव्यतेपेक्षा इथे शांतता आणि पवित्रता अधिक जाणवते. मंदिर प्राचीन काळापासून पूजास्थान म्हूणून ओळखलं जातं. सध्याच्या मंदिराचं बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी 18 व्या शतकात केलेले आहे असे अनेक दाखले सांगतात. पेशव्याच्या काळातही या मंदिराला विशेष महत्त्व होतं. अनेक संत आणि भक्तांनी येथे साधना केली असे देखील येथील दाखले सांगतात. असे म्हणतात या मंदिराला सात प्रदक्षिणा म्हणजे गिरी प्रदक्षिणा घातल्याने खूप पुण्य मिळते. सिद्धटेकच्या सिद्धीविनायकाची पौराणिक कथा काय आहे ते जाणून घेऊया

Mahavir Jayanti 2026: श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायातील परंपरा, योगदान आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

सिद्धिविनायक मंदिराचे पौराणिक महत्त्व

ही कथा भगवान विष्णू आणि राक्षसांची संबंधित आहे. सृष्टीच्या सुरुवातीला भगवान विष्णू योगनिद्रेत होते त्यांच्या कानातून मधु आणि कैठक नावाचे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रम्हा यांना त्रास देईला सुरुवात केली. ब्रम्हांनी विष्णूंना जागे केले आणि राक्षसाचा वध करण्यास सांगितले विष्णूंनी युद्ध केलं पण त्यांना काही यश मिळेना. तेव्हा भगवान शिव यांनी सांगितले तू प्रथम गणपतीची उपासना कर. त्यानंतर विष्णूंनी सिद्धेटेक येथे तपश्चर्या करून गणपतीची पूजा केली. गणपती प्रसन्न झाले आणि विष्णूंना सिद्धी दिली. मग विष्णूंनी मधु आणि कैठक राक्षसाचा वध केला यामुळे याला सिद्धटेक आणि गणपतीला सिद्धीविनायक असं नाव पडलं. सिद्धटेकचा सिद्धीविनायक हा अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिद्धटेकचा सिद्धीविनायक मंदिर कुठे आहे?

    Ans: हे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक गावात भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे.

  • Que: या मंदिराचे सर्वात खास वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: येथे गणपतीची सोंड उजव्या बाजूला (दक्षिणमुखी) आहे, जी अत्यंत शक्तिशाली आणि जागृत मानली जाते.

  • Que: या मंदिराशी संबंधित पौराणिक कथा काय आहे?

    Ans: भगवान विष्णूंनी येथे गणपतीची उपासना करून मधु-कैठक राक्षसांचा वध करण्यासाठी सिद्धी प्राप्त केली.

Web Title: Ashtavinayaka who is the specialty of siddhivinayak temple of siddhatek

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
1

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना
2

Pitru Paksha: पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भविष्य? नशिबाची साथ मिळते की करावा लागतो अडचणींचा सामना

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध
3

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.