Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिरांमध्ये उत्साह; पंढरपूरसह या ठिकाणी केले जाते विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोज

Kartiki Ekadashi 2026: आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशी देखील सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी चातुर्मासाचे उद्यापन सुद्धा होते.. यावर्षी कार्तिकी एकादशी २१ नोव्हेंबर रोजी आहे. कार्तिकी एकादशी कोणकोणत्या विठ्ठल मंदिरात उत्साहात साजरी केली जाते ते सव

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 15, 2026 | 01:30 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • कार्तिकी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो
  • या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते.
  • कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 

 

 

हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठलाची पूजा केली जाते आणि भक्त दिवसभर उपवास करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वदशीला सोडला जातो. या दिवशी विविध मंदिरामध्ये भजन, कीर्तन आणि हरिनामाचा, विठ्ठलनामाचा गजर केला जातो.

आषाढी एकादशीनंतर वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी हा महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. यंदा २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूरची कार्तिकी यात्रा होणार असून, विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक दाखल होत असतात. विशेष म्हणजे, हा उत्सव केवळ पंढरपुरातच नव्हे, तर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध विठ्ठल मंदिरांमध्येही भक्तिभावाने साजरा केला जातो.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात यात्रेची जय्यत तयारी

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये मोठ्या यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा १० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत यात्रा पार पडणार आहे. या काळात लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी नियोजन करण्यात येत आहे. दर्शन रांगेतील व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशीला तयार अनेक शुभ योगायोग, या …

चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता, प्रकाशव्यवस्था आणि भक्तिसागर मैदानातील सुविधांचे नियोजनही यात्रेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मंदिर प्रशासन कडून भक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि विठ्ठलाचे दर्शन निर्विघ्नपणे घेता येईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

मुंबईतील वडाळा विठ्ठल मंदिरातही कार्तिकीचा उत्साह

मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिराला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या मुंबईकर विठ्ठलभक्तांसाठी हे मंदिर श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा, भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. या दिवशी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ असते.

धापेवाडा येथील विठ्ठल मंदिरातही धार्मिक सोहळा

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे विदर्भातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामुळे या परिसराला विशेष ओळख आहे. कार्तिकी एकादशीच्या काळात येथेही विठ्ठलभक्त दर्शनासाठी येतात. भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. त्यामुळे विदर्भातील भाविकांसाठीही कार्तिकी एकादशीचा हा दिवस महत्त्वाचा असतो.

वाळूज येथे मोठी यात्रा भरते

मराठवाड्याचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज येथील या मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते. भजन, कीर्तन आणि दिंड्यांच्या गजरात येथे हजारो भक्त विठुरायाचे दर्शन घेतात.

Bodan ritual: बोडण विधी म्हणजे काय? चित्पावन ब्राह्मण समाजातील या अनोख्या कुलाचाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

कोकणातही विठ्ठलनामाचा गजर

कोकणातील भाविकांसाठी रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर हे मोठे श्रद्धास्थान आहे. कार्तिकी एकादशीला येथे पालखी सोहळा आणि विशेष महापूजा आयोजित केली जाते. तसेच खोपोलीजवळील साजगाव-ताकई येथील डोंगरावर विठ्ठल-रुक्मिणीचे सुंदर मंदिर आहे, ज्याला ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी कार्तिकी एकादशीला यात्रा सुरू होते आणि साधारणपणे १० ते १५ दिवस चालते. यात्रेत भजन, कीर्तन, महाप्रसाद/अन्नदान तसेच मनोरंजनाच्या खेळांची मोठी गर्दी असते. रायगडसह आसपासच्या परिसरातील लाखो भाविक यात्रेला हजेरी लावतात.

कोल्हापूर नंदवाळ येथील विठ्ठल मंदिर

कोल्हापूरपासून जवळच असलेल्या नंदवाळ गावाला करवीर महात्म्यात मोठे स्थान आहे. विठ्ठल दररोज रात्री येथे वास्तव्यास येतात अशी भाविकांची श्रद्धा असल्याने एकादशीला येथे मोठी गर्दी होते.

रेल्वे स्थानकांवर कार्तिकी एकादशीचा उत्साह

हल्ली धावपळीच्या युगामध्ये वारकरी मंडळींना कामानिमित्त मंदिरात जाऊन भजन, कीर्तन कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी असोसिएशनच्या वतीने रेल्वे स्थानकावरती विठ्ठल रक्मिणीची प्रतिमा ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच इतर प्रवासी मंडळी रेल्वेमध्ये प्रवाशांसोबत भजन करून देवाचे नामस्मरण करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये काय विशेष असते?

    Ans: या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

  • Que: पंढरपूरशिवाय कार्तिकी एकादशी कुठे साजरी केली जाते?

    Ans: मुंबईतील वडाळा येथील प्रति पंढरपूर मंदिर आणि नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा यांसारख्या ठिकाणीही कार्तिकी उत्सव साजरा केला जातो.

  • Que: कार्तिकी एकादशीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा केल्याने पुण्यलाभ होतो.

Web Title: Kartiki ekadashi 2026 vitthal temple celebrations pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Kartiki Ekadashi

संबंधित बातम्या

Bodan ritual: बोडण विधी म्हणजे काय? चित्पावन ब्राह्मण समाजातील या अनोख्या कुलाचाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
1

Bodan ritual: बोडण विधी म्हणजे काय? चित्पावन ब्राह्मण समाजातील या अनोख्या कुलाचाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Jatayu Temple: रामायणातील जटायूंचे बलिदान आठवण करून देतात ही मंदिरे; जाणून घ्या जटायू मंदिरांचा रंजक इतिहास
2

Jatayu Temple: रामायणातील जटायूंचे बलिदान आठवण करून देतात ही मंदिरे; जाणून घ्या जटायू मंदिरांचा रंजक इतिहास

Dream Meaning: स्वप्नात छठ पूजा दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे अर्थ
3

Dream Meaning: स्वप्नात छठ पूजा दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे अर्थ

Vrishchik Sankranti: कधी आहे वृश्चिक संक्रांती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vrishchik Sankranti: कधी आहे वृश्चिक संक्रांती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.