फोटो सौजन्य- pinterest
आपल्या प्रत्येकालाच असे वाटते की, आपण ज्या कामासाठी बाहेर पडलो आहोत ते काम कोणत्याही व्यत्याशिवाय किंवा समस्येशिवाय पूर्ण व्हावे. बऱ्याचदा असे होते की, आपण खूप मेहनत घेऊनसु्द्धा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. लोक नशिबाची साथ मिळविण्यासाठी नेहमीच काही ना काही उपाय करत असतात. वेलची आणि दालचिनी या दोन अशा गोष्टी आहेत ज्या केवळ स्वयंपाकघराचा प्राण नाहीत तर ज्योतिष आणि परंपरेत देखील खूप प्रभावी मानल्या जातात. असे मानले जाते की जर घराबाहेर पडण्यापूर्वी हे उपाय केल्यास कामातील अडथळे दूर होऊन यश मिळू शकते. घराबाहेर पडताना कोणते उपाय करायचे, जाणून घ्या.
भारतीय परंपरेत दालचिनी आणि वेलची हे दोन्ही मसाले शुभ मानले जातात. त्यांची चव आणि सुगंध सर्वांनाच आवडते. मात्र ज्योतिषशास्त्रात त्याचा संबंध ग्रहांशी जोडलेला आहे. दालचिनी शुक्र आणि शनि ग्रहांचे प्रतीक आहे, तर वेलची बुध ग्रहांचे प्रतिनिधित्व करते. हे दोन्ही घटक ग्रहांचे संतुलन राखल्याने व्यक्तीला जीवनात संपत्ती, शहाणपण आणि यश मिळते असे मानले जाते.
असे म्हटले जाते की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या खास प्रसंगी बाहेर जात असाल तर हा उपाय केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. दालचिनीचा एक छोटा तुकडा आणि वेलचीचा एक छोटा तुकडा घ्या. घराबाहेर पडताना हे घटक चावून खा. घराच्या बाहेर पडताना नेहमी उजवा पाय बाहेर ठेवा.
हा उपाय करण्यामागील उद्देश असा आहे की, दालचिनी आणि वेलची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवते. उजव्या पायावर चालणे शुभ मानले जाते. तसेच शक्य झाल्यास घराबाहेर पडताना तीन वेळा टाळ्या वाजवा म्हणजे नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. असे केल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी शुक्र, शनि आणि बुध हे ग्रह शुभ स्थितीत असतात त्याला लक्ष्मी नारायण राजयोग म्हणतात. हा योग व्यक्तीचे नशीब उजळवू शकतो आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण करू शकतो. त्यामुळे अशी देखील मान्यता आहे की, तुम्ही जर रिकाम्या हाताने बाहेर पडत असाल तर येताना तुमचे खिसे भरलेले असतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)