फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, दरवर्षी नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. हा उत्सव एकूण नऊ दिवस चालतो. या काळात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या काळामध्ये या वस्तूंची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे देवी प्रसन्नच होत नाही तर तिचा कुटुंबातील सदस्यांवर आशीर्वाद देखील राहतो.
नवरात्रीच्या काळामध्ये आपण कधीही या गोष्टींची खरेदी करु शकतो. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता तर येतेच त्यासोबतच घरगुती समस्या, आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी यांसारख्या येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते. नवरात्रीमध्ये कोणत्या वस्तूंची खरेदी करायची ते जाणून घ्या
नवरात्रीमध्ये धातू, सोने, चांदी किंवा पितळापासून बनवलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते.
तसेच मालमत्ता, वाहने, भांडी, फर्निचर आणि घरगुती वस्तू इत्यादींची देखील खरेदी करणे शुभ मानले जाते.
नवरात्रीत सौंदर्यप्रसाधने आणि कपडे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
यासोबतच पिंपळ, वड, तुळशी, अशोक, कमळ, केळी, बेल आणि कडुनिंब यांसारखी धार्मिक झाडे आणि वनस्पती खरेदी करणे शुभ असते. ही रोपे किंवा वनस्पती तुमच्या घरामध्ये कोणत्याही पवित्र ठिकाणी लावू शकता. त्यांची नियमित पूजा करुन त्यांना पाणी अर्पण करावे.
त्यानंतर घरामध्ये कामधेनू गाईची मूर्ती असणे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीच्या दिवसात या मूर्तीची खरेदी केल्याने घरामधील सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढण्यास मदत होते. तसेच देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते.
शारदीय नवरात्रीत गाईचे तूप खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यानंतर देवीसमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होते.
नवरात्रीच्या काळात, चांदीचे नाणे खरेदी करुन देवीच्या चरणी अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंद, संपत्ती आणि समृद्धी येते.
मान्यतेनुसार, जव हे विश्वाचे पहिले पीक आहे. नवरात्रीत जव खरेदी करुन देवीला अर्पण करा. यामुळे देवीचा कायम तुमच्यावर आशीर्वाद राहील.
पिवळा तांदूळ हा शुभ, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. म्हणून, नवरात्रीत पिवळा तांदूळ खरेदी करून तो देखील आपण देवीला अर्पण करु शकतो.
नवरात्रीच्या दिवसात घरामध्ये यंत्र बसवा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. नवरात्रीदरम्यान दुर्गा यंत्र, लक्ष्मी यंत्र, शनि यंत्र किंवा विष्णू यंत्र खरेदी करू शकता. तसेच, नियमितपणे या यंत्रांची पूजा करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)