
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठं महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज बांधता येतो. राशीचक्र, कुलदैवत याप्रमाणेच महत्वाचं ठरतं ते म्हणजे गोत्र. पिढ्यानपिढ्या सुरु असलेल्या गोत्र या संकल्पनेला आजतागायत मोठं महत्व आहे. पण हे गोत्र म्हणजे नक्की असतं तरी काय आणि याचा परिणाम मानवी आयुष्यावर कसा होतो या सगळ्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
गोत्र ही हिंदू धर्मातील महत्वाची अशी संकल्पना आहे. असं म्हणतात ऋषिमुनींच्या काळात या गोत्राची निर्मिती झाली. पण तरी प्रश्न उरतोच की हे, गोत्र नक्की काय ? गोत्र ही कुळाशी संबंधित संकल्पना आहे. गोत्रावरुन एखाद्या व्यक्तीचं कुळ, मूळ ठिकाण संंबंधित व्यक्ती ही कोणत्या ऋषिकुळातील आहे किंवा कोणत्या ऋषिंचा वंश आहे ते या गोत्रावरुन ज्योतिषशास्त्राच्या आधारे कळतं.
खास करुन सांगायचं तर ब्राम्हण वर्गात गोत्र या संकल्पनेला लग्नासाठी तयार असलेल्या वधुवरांच्या पत्रिकेदरम्यान कटाक्षाने याचा विचार केला जातो. एकच गोत्र असलेल्या कुटुंबात सहसा लग्न होत नाही. एक गोत्र म्हणजे एकच कुळ असं म्हटलं जातं. ब्राम्हण वर्गात गोत्र महत्वाचं मानतात कारण ऋषिकुळातून ब्राम्हण वर्गाची निर्मिती झाली. त्यामुळे ब्राम्हण वर्ग गोत्राला विशेष महत्व देतो.
सनातन हिंदू पुराणानुसार असं म्हटलं जातं की, 4 ऋषिंच्या नावाने गोत्र परंपरा सुरु झाली. हे चार ऋषि म्हणजे अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु. या ऋषिंचा वंश पुढे जो वाढत गेला त्या पुढच्या पिढ्यांचं गोत्र हे चार ऋषिंच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्याचबरोबर अन्य चार गोत्रांचाही यात समावेश करण्यात आला तो म्हणजे, – अत्री, जन्मदग्नी, विश्वामित्र आणि अगस्त्य. एकाच गोत्रातील मुलं मुलींचे पुर्वज हे एकच असल्याने ते भाऊ बहीण होतात त्यामुळे एका गोत्रातील मुला मुलींना विवाह करु नये असं हिंदू धर्म सांगतो.
अनेकदा गोत्र माहित नसल्यास ब्राम्हण वर्गात संबंधित व्यक्ती काश्यप गोत्र लावते. याचं कारण म्हणजे, काश्यप ऋषिंची अमेक विवाह झाली होती त्यामुळे त्यांची अपत्ये देखील जास्त होती म्हणूनच ज्यांना आपलं गोत्र माहिती नाही अशी मंडळी काश्यप गोत्र लावतात. कोणे एकेकाळी गोत्र ही संकल्पना फार महत्वाची होती मात्र सध्याच्या युगात गोत्र फक्त लग्न जुळवताना पाहिलं जातं. त्यामुळे आताच्या युगात गोत्र ही संकल्पना हळूहळू लोप पावत गेली.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गोत्र ही हिंदू धर्मातील महत्वाची अशी संकल्पना आहे. असं म्हणतात ऋषिमुनींच्या काळात या गोत्राची निर्मिती झाली.
Ans: सनातन हिंदू पुराणानुसार असं म्हटलं जातं की, 4 ऋषिंच्या नावाने गोत्र परंपरा सुरु झाली. हे चार ऋषि म्हणजे अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु. या ऋषिंचा वंश पुढे जो वाढत गेला त्या पुढच्या पिढ्यांचं गोत्र हे चार ऋषिंच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
Ans: एकाच गोत्रातील मुलं मुलींचे पुर्वज हे एकच असल्याने ते भाऊ बहीण होतात त्यामुळे एका गोत्रातील मुला मुलींना विवाह करु नये असं हिंदू धर्म सांगतो.