फोटो सौजन्य- pinterest
चतुर्थीला गणपतीच्या गणाधिप रूपातील पूजेसाठी समर्पित आहे. यावेळी बुद्धी, ज्ञान आणि सिद्धीची देवता मानले जाते. नोकरीतील अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रगती मिळविण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करणे खूप फायदेशीर आहे. यावेळी चंद्रोद्याच्या दिवशी काही उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्यास मदत होते. संकष्टी चतर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी ही गणाधिप संकष्टी म्हणून ओळखली जाते. यावेळी चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.32 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी रविवार, 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.25 वाजता होईल. अशा वेळी शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. यावेळी चंद्रोद्य रात्री 8 वाजून 1 मिनिटांनी असेल.
चंद्रोद्यापूर्वी गणपती बाप्पासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्यानंतर 21 दुर्वा आणि त्यांचे आवडते मोदक किंवा तिळाचे लाडू त्यांना अर्पण करावे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी दुर्वा आणि मोदक अर्पण करणे चांगले मानले जाते. असे मानले जाते की, हे उपाय केल्याने कामाच्या ठिकाणी अडथळे दूर होतात आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होते.
चंद्रोदयानंतर गणेशमूर्तीसमोर बसून संकटनाशन गणेश स्तोत्र कमीत कमी तीन वेळा पठण करा. या स्तोत्राचे पठण केल्याने सर्व त्रास आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. या स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर आहे.
चंद्राला जल अर्पण करतेवेळी पाण्यात हळद आणि तांदूळ टाकावे. अर्पण करताना बाप्पासमोर हात जोडून ओम श्री गणेशाय नम:” किंवा “ओम गणपतये नम: या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने ज्ञान, भाग्य आणि पदोन्नती मिळते. त्यासोबतच सुख समृद्धी देखील मिळते.
बाप्पाची पूजा झाल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ.” निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने, मुलाखतींमधील अडथळे, सौद्यांमध्ये यश आणि कोणत्याही नवीन प्रकल्पात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: कारण या दिवशी काही उपाय केल्याने नोकरी आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते
Ans: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ." निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्रांचा जप करावा






