
फोटो सौजन्य- pinterest
धार्मिक व्यक्ती विविध देवांच्या, देवींच्या नावे उपवास करतात तर काही लोक संकष्टी चतुर्थी, नवरात्र, श्रावणमास, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असे व्रत घेऊन उपवास करतात. रोजच्या दिनचर्येत कधी, कधी एखादा उपवास लक्षात राहत नाही किंवा उपवास असताना चुकून आवडीचा पदार्थ समोर येतो आणि तो खाल्ला जातो. त्यामुळे उपवास भंग पावला जातो किंवा त्यांचे पावित्र्य राखले जात नाही. अशावेळी अनेकांना भीती वाटते किंवा अस्वस्थ वाटते त्यामुळे यावेळी काय केलं पाहिजे ते जाणून घेऊया
उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे अशी उपवासाची व्याख्या होते. त्यामुळे ज्या देवाच्या नावाने उपवास करायचा आहे. त्याच्या भक्तीत तल्लीन राहणे आणि यावेळी हलका आहार घेणे. त्याचबरोबर आयुर्वेदात सांगितलेले आहे की, एक दिवस लंघन करणे म्हणजे उपवास करणे. हे शरीरासाठी फायदेशीर असते.
चुकून उपवास मोडला तर घाबरून न जाता, देवतेची क्षमा मागावी आणि पुन्हा उपवास सुरू ठेवावा. शास्त्रात याला दोष मानले जात नाही. प्रायश्चित्त म्हणून देवासमोर दिवा लावून माफी मागावी, दान करावे आणि उरलेला दिवस उपवासाचे नियम पाळावेत.
चुकून उपवास मोडल्यास सर्वात आधी देवाची मनापासून माफी मागा. ‘अजाणतेपणी चूक झाली, क्षमा करा’ असे म्हणावे.
चूक लक्षात आल्यानंतर, जेवण किंवा पाणी थांबवा आणि उर्वरित दिवस उपवास पूर्ण करा. जर तुम्हाला जास्त अपराधी वाटत असेल, तर त्या दिवशी एखादी चांगली गोष्ट दान करा किंवा गरिबांना जेवण भरवा. असे प्रायश्चित्त घ्यावे. तर काही विशिष्ट व्रत (उदा. हरतालिका, नवरात्र) असतील तर, पुढच्या वर्षी तो उपवास अधिक निष्ठेने करण्याचे वचन देवाला द्या. त्याचबरोबर धर्मशास्त्रात असेही सांगितले आहे की, अजाणतेपणीची चूक झालीच जर तुम्ही विसरून काही खाल्ले, तर उपवास मोडत नाही, असे धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर उपवास हा मन आणि देवाच्या संबंधांचा भाग आहे, त्यामुळे अपराधी न वाटून घेता सकारात्मक राहावे.
अनेकदा कामाच्या घाईत किंवा विसरभोळेपणामुळे अनावधानाने काहीतरी खाल्ले जाते आणि उपवास मोडतो. शास्त्रानुसार, जर चूक नकळत झाली असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. देवाच्या किंवा देवीच्या नावाने उपवास करतात. तर नवरात्रीत कडक नियमांचे पालन केले जाते, मात्र अनेकदा कामाच्या घाईत किंवा विसरभोळेपणामुळे अनावधानाने काहीतरी खाल्ले जाते आणि उपवास मोडतो. अनेकदा आपण उपवास ठेवतो आणि कधीकधी चुकून आपण काही खाऊन जातो. अशा वेळी मनात भीती निर्माण होते की देवी कोपेल का किंवा उपवासाचे पुण्य मिळेल का? शास्त्रानुसार, जर चूक नकळत झाली असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. काही विशिष्ट धार्मिक उपायांनी या दोषाचे निवारण करता येते.
उपवास मोडल्याचे लक्षात येताच सर्वात आधी शांत व्हा आणि घाबरू नका. देवाला भाव महत्त्वाचा असतो, तुमचे मन नाही. अशा वेळी त्या देवदेवताच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हात जोडून उभे राहा आणि आपली चूक प्रांजळपणे मान्य करा. “हे देवा, नकळत माझ्याकडून ही चूक झाली आहे, कृपया मला क्षमा कर,” अशी क्षमा प्रार्थना करा. शास्त्रानुसार, पश्चात्ताप हा सर्वात मोठा प्रायश्चित्त मानला जातो. यामुळे मनातील अपराधीपणाची भावना दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते.
चूक झाल्यानंतर पुन्हा एकदा स्नान करणे किंवा अंगावर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करणे.
धार्मिक ग्रंथांनुसार, कोणत्याही चुकांचे निराकरण करण्यासाठी ‘दान’ हा सर्वोत्तम मार्ग आहे. अनावधानाने उपवास मोडला असेल, तर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला धान्य, फळे किंवा काही दक्षिणा दान करा. तसेच, गाईला चारा किंवा गुळ-पोळी खायला दिल्याने मोठे दोष नष्ट होतात, अशी मान्यता आहे. हे पुण्याचे काम तुमच्याकडून झालेल्या चुकीची भरपाई करण्यास मदत करते आणि देवीची कृपा तुमच्यावर कायम राहते.
अनेकांना प्रश्न पडतो की एकदा काही खाल्ल्यावर उपवास सुरू ठेवावा का? शास्त्रानुसार, जर तुम्ही चुकून काही खाल्ले असेल, तर तो दिवस व्यर्थ न घालवता उर्वरित दिवस उपवास सुरू ठेवावा. पुन्हा सात्विक आहार किंवा फलाहार घेऊन तुम्ही तुमचे व्रत पूर्ण करू शकता. नियत आणि श्रद्धा शुद्ध असेल तर देवी तुमचे व्रत नक्कीच स्वीकारते. लक्षात ठेवा, उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नसून तो मनावर संयम ठेवण्याचा सराव आहे, त्यामुळे निराश न होता पुढच्या दिवसांची भक्ती जोमाने करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धर्मशास्त्रानुसार जर उपवास चुकून मोडला असेल तर तो दोष मानला जात नाही. भावनेपेक्षा (श्रद्धा) चुकांना महत्त्व कमी दिले जाते.
Ans: होय, पूजा करता येते. मन शुद्ध ठेवून देवाची आराधना करणे महत्त्वाचे आहे.
Ans: देवाची मनापासून क्षमा मागावी, पुन्हा संकल्प करून उर्वरित दिवस साधेपणाने घालवावा, शक्य असल्यास जप किंवा पूजा करावी