फोटो सौजन्य- pinterest
बाबा वेंगा या खळबळजनक भाकितेसाठी ओळखल्या जातात. त्यांची काही भाकित खरी ठरली आहेत तर कधीकधी भाकितांमुळे ते वादातही सापडले आहे. बाबा वेंगा हिचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. तिचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते. बाबा वेंगा यांना बाल्कनचे नोस्ट्राडेमस म्हणूनही ओळखले जाते. 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांनी 2025 मधील भाकित करताना म्हटले आहे की, काही राशीच्या लोकांसाठी हा काळ भरपूर संपत्ती आणि समृद्धी आणणारा असेल.
बाबा वेंगना यांची अनेक भाकिच चर्चेत आलेली आहे. बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या झाल्या आहेत. बाबा वांगा यांनी 9/11 हल्ला यापैकी. राजकुमारी डायनाच्या मृत्यूसारख्या अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. आता 2025 मध्ये त्यांनी भविष्यवाणी केली आहे, यात असे म्हटले आहे की या वर्षा अखेरीस मेष राशीसह इतर 4 राशीचे लोक श्रीमंत बनू शकतात. मेष राशीसह इतर 4 कोणत्या राशी श्रीमंत बनू शकताता याचा उल्लेख बाबा वेंगानी केला आहे, ते जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांना अनेक बदलांना तोंड द्यावे लागू शकते. या लोकांना होणारे बदल स्वीकारता आले पाहिजे. या लोकांना यश आणि समृद्धी मिळविण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. हे लोक त्यांच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने मोठे यश मिळवू शकता. मेष राशीचे लोक नवीन सुरुवात करण्यासाठी तयार राहू शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष उत्साहाने भरलेले असेल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. परंतु कोणत्याही योजनेमध्ये किंवा दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करताना काळजी घ्या. या योजनेचा तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल.
मिथुन राशीच्या लोकांना या वर्षामध्ये अनेक संधी मिळतील. हे लोक त्यांच्यामधील असलेले बुद्धिमत्ता आणि अनुकूलतेचा वापर करून येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकतात. यामुळे या लोकांची आर्थिक स्थिरता आणि वैयक्तिक वाढ साध्य करता येईल. मिथुन राशीचे लोक सर्जनशीलतेचा वापर करा. तुमच्याकडे असलेल्या नवीन कल्पना किंवा योजनांवर काम करा. यामुळे तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतीला त्याचा तुम्हाला फायदा होईल.
या वर्षामध्ये सिंह राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा येईल. या लोकांच्या जीवनात अनेक बदल घडून येतील. कोणतेही निर्णय घेताना हुशारीने घ्या. या गोष्टीचा तुम्हाला फायदा होऊन तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगार वाढ होऊ शकतो. हे लोक नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकतात. या लोकांना हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)