
फोटो सौजन्य - Social Media
काल भैरव भगवान शंकराचा उग्र रूप आहे. पुराणांमध्ये सांगितले गेले आहे कि भगवान शिव ब्रह्मदेवांपासून खूप क्रोधीत होते. या उग्र रागामध्ये काल भैरवाची उत्पत्ती झाली. काही कथांमध्ये असे नमूद आहे कि भगवान शंकराच्या रक्तापासून काल भैरवाची निर्मिती झाली. शिवजींच्या गणांमध्ये काल भैरव यांना देखील एक मानले जाते. ज्या दिवशी काल भैरव यांची उत्पत्ती झाली, ती तारीख मार्गशीर्ष किंवा अगहन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला होती. म्हणून दरवर्षी या तिथीला काल भैरव जयंती म्हणून साजरी केली जाते. यावर्षी काल भैरव जयंती २३ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे.
भगवान काल भैरव यांच्याशी संबंधित एक अत्यंत रोचक गोष्ट म्हणजे त्यांचे वाहन. काल भैरव यांची प्रतिमा पाहिली तर त्यांच्यासह त्यांचा वाहन नेहमी दिसून येतो. काळ्या रंगाचा श्वान भगवान काळ भैरव यांचा वाहन आहे. परंतु, अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल कि काल भैरवाचा वाहन काळ्या रंगाचा श्वानच का? चला तर मग जाणून घेऊयात याचे उत्तर.
काळ्या रंगाचा श्वान कसा बनला भगवान काल भैरव यांचा वाहन?
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांकडे वाहन दिसून येते. प्रत्येक देवतेची स्वतःची अशी विशेष सवारी आहे. धार्मिक ग्रंथानुसार, काळ्या रंगाचा श्वान भगवान काल भैरव यांचा वाहन आहे. विशेष गोष्ट अशी आहे कि काल भैरव यांच्या प्रतिमेत देव कधी त्या श्वानावर सवार झाले नाही आहेत. असे कधीही दिसून आले नाही. उलट, काळ्या रंगाचा श्वान नेहमी काल भैरवाच्या सोबत असतो.
श्वान हा इमानदार प्राणी आहे. मालकाच्या प्रति त्याची इमानदारी जगजाहीर आहे. त्याच्या या गुणवत्तेमुळे बहुतेक जणांना श्वान पाळण्याची आवड आहे. श्वान फक्त इमानदार नसून खूप उग्रदेखील आहे. निर्भय असा हा प्राणी समोर काहीही असो मुळीच घाबरत नाही. याउलट, समोरच्या गोष्टीला न घाबरता त्याच्याशी लढा देणे श्वानाचा गुणधर्म आहे. श्वान नकारात्मकतेकडे आकर्षित होत नाही. त्याला स्वतःचा बचाव करता येतो. त्याच्या अशा गुणधर्मामुळे शंकराच्या उग्र रूपाचे म्हणजे काल भैरवाचे वाहन म्हणून श्वानाकडे पाहिले जाते. काल भैरव यांच्यासोबत नेहमी काळ्या रंगाचे श्वान असण्याचे कारण त्यांचा रक्षक आणि संरक्षक रूप दर्शवते. म्हणूनच, श्वानाला खाऊ घालल्याने काल भैरव देखील प्रसन्न होतात असे मानले जाते.