Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Bhadrapad Purnima 2026: हिंदू पंचांगातील भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवसांपासून पितृपक्षाची सुरुवात होते. यंदा भाद्रपद पौर्णिमा कधी आहे, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 24, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • भाद्रपद पौर्णिमा कधी आहे
  • भाद्रपद पौर्णिमेला भगवान विष्णू आणि सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा
  • भाद्रपद पौर्णिमा आणि पितृपक्षाचा काय संबंध आहे
 

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची शेवटची तिथी म्हणजे भाद्रपद पौर्णिमा. या पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून अनेक ठिकाणी पितृपक्षाशी संबंधित धार्मिक विधींना सुरुवात होते. पूर्वजांचे स्मरण, तर्पण आणि दानधर्मासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तसेच भगवान विष्णू आणि सत्यनारायणाची पूजा, चंद्राला अर्घ्य तसेच दानधर्म करण्याची परंपरा काही ठिकाणी असल्याचे दिसून येते. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. यंदा भाद्रपद पौर्णिमा कधी आहे, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया

कधी आहे भाद्रपद पौर्णिमा

पंचांगानुसार पौर्णिमा तिथीची सुरुवात २५ सप्टेंबरच्या रात्री सुमारे ११:०६ वाजता होत आहे आणि ही तिथी २६ सप्टेंबरच्या रात्री सुमारे १०:१८ वाजता संपेल. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमा यंदा शनिवार, २६ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

भाद्रपद पौर्णिमेला पूजा करण्याची पद्धत

भाद्रपद पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर भगवान विष्णू किंवा सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा आहे.

पूजेसाठी देवासमोर स्वच्छ आसन मांडून कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूंना फुले, तुळशीची पाने, फळे, नैवेद्य आणि दीप अर्पण करावा. इच्छेनुसार सत्यनारायणाची कथा वाचावी किंवा ऐकावी. पूजा झाल्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राला अर्घ्य देण्याचीही परंपरा आहे. आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार पूजा-विधी करणे महत्त्वाचे मानले जाते.

भाद्रपद पौर्णिमा म्हणजे काय?

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची शेवटची तिथी म्हणजे पौर्णिमा. या दिवशी चंद्र पूर्ण स्वरूपात दिसतो. हिंदू चांद्र पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष सुरू होतो.

Pitru Paksha 2026: गणपती बाप्पांना निरोप देताच पितृपक्ष सुरू! कोणत्या दिवशी करायचं श्राद्ध? पाहा तिथीनुसार संपूर्ण यादी

भाद्रपद पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षात पितरांच्या स्मरणासाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमा ही पितृपक्षाच्या संदर्भातही महत्त्वाची मानली जाते.

भाद्रपद पौर्णिमेचा पितृक्षाची काय आहे संबंध

भाद्रपद पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष सुरू होतो. या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून सर्वपितृ अमावास्येपर्यंतचा कालावधी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो.

कुटुंबातील दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा या काळात आहे.

भाद्रपद पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

हिंदू धार्मिक परंपरेनुसार पौर्णिमा ही पूजा, जप, ध्यान आणि दानासाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. भाद्रपद पौर्णिमा पितृपक्षाच्या आधी येत असल्याने पूर्वजांचे स्मरण आणि पुढील श्राद्धकर्मांसाठीही या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Bhadrapad purnima 2026 muhurat puja rituals and relationship with pitru paksha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
1

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
3

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
4

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.