फोटो सौजन्य- pinterest
दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये शेवटचा दिवस भाऊबीज. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणींमधील पवित्र आणि अतूट प्रेमाच्या बंधनाचे प्रतीक आहे. भाऊबीज हा एक खास सण आहे ज्यावेळी बहिणी त्यांच्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करते. त्यावेळी भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना देखील करते. या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत देखील आहे. कधी आहे भाऊबीज आणि काय आहे मुहूर्त जाणून घ्या
पंचांगानुसार दरवर्षी भाऊबीजेचा सण हा कार्तिक महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी, कार्तिक महिन्याचा दुसरा दिवस 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8.16 वाजता सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी रात्री 10.44 पर्यंत आहे. परिणामी भाऊबीजेचा सण यावेळी गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी शुभ मुहूर्त दुपारी 1.13 ते 3.28 पर्यंत आहे.
भाऊबीजेच्या दिवशी भावाला पूर्व दिशेला तोंड करुन बसवावे. टिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात. ओवाळते वेळी सुपारी किंवा सोन्याच्या दागिन्याचा वापर करावा. साखर किंवा मिठाई भरवून तोंड गोड करावे. त्यानंतर दिव्याने त्याला ओवाळून घ्यावे.
धार्मिक मान्यतेनुसार, भाऊबीजेशी संबंधित कथा ही यमराज आणि यमुनाशी जोडलेली आहे. कथेनुसार एकेदिवशी यमुनेने तिचा भाऊ यमराजला त्याच्या घरी बोलावले होते. यमराजांनी हे आव्हान स्वीकारले होते. ज्यावेळी तो तिच्या घरी पोहोचला त्यावेळी तो तिच्या आदरतिथ्याने प्रसन्न झाला होता. त्यानंतर तिने भावाला निरोप देताना नारळ दिला होता. यमराजांनी याचे कारण विचारले त्यावेळी ती म्हणाली की, हा नारळ तुम्हाला माझी आठवण करुन देत राहील. यामुळे ओवाळणीच्या ताटामध्ये नारळ ठेवला जातो. तर काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची प्रथा आहे.
दुसऱ्या कथेनुसार, यमराज ज्यावेळी प्रसन्न झाले होते त्यावेळी त्यांनी तिला वरदान दिले की जो कोणी ही कथा ऐकेल आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करेल, त्याच्या भावाला दीर्घायुष्य मिळेल आणि त्याला अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)