
Black Thread on Feet: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अनेक मुलींना पायात काळा धागा बांधायला आवडतं. पण पायात काळा धागा बांधण्याचे देखील काही नियम आहेत. आजकाल बऱ्याच मुली पायात काळा धागा बांधतात तो फक्त फॅशन म्हणून घालतात मात्र, पण याचे पण काही नियम आहेत. शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पायाला काळा धागा बांधण्यामागे भक्कम आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. शास्त्रात यामागे मोठं कारण सांगितलंय. तर जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त… Black Thread on Feet:
हिंदू धर्मात शास्त्र आणि ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व आहे.आपल्या हिंदू धर्मात शास्त्राला, ज्योतिषाला खूप मानलं जातं. सांगायचं झालं तर, अनेकजण पायात काळा धागा बांधतात. आजची तरुण पिढी फॅशन म्हणूनही पायात काळा धागा बांधते. त्यांना वाटतं, छान दिसतं. पण, शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पायाला काळा धागा बांधण्यामागे भक्कम आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत.फक्त फॅशन नाहीये, यामागे मोठं कारण आहे. असं देखील सांगितलं जातं की, आपल्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जा आणि दृष्टदोषापासून आपले संरक्षण करण्यासाठी काळा धागा बांधला जातो.
आपल्याला कोणाची नजर लागू नये, वाईट ऊर्जा लागू नये, म्हणून हा धागा बांधतात. काही लोकांना संध्याकाळी विनाकारण खूप थकवा जाणवणे, वारंवार आजारी पडणे किंवा कामात गती मंदावणे यांसारख्या समस्या येतात. अशा परिस्थितीत, शरीरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टदोषाचा प्रभाव टाळण्यासाठी पायाला काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.असं होत असेल, तर पायात काळा धागा बांधा, चांगली ऊर्जा टिकून राहते, नजर लागत नाही, असं सांगितलं जातं.
कालभैरव आणि नऊ ग्रहांमधील संबंध:काशी परंपरेनुसार, या काळ्या धाग्याला ‘काशी दारा’ असंही म्हटलं जातं.काशीमध्ये याला काशी दारा म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, काळा धागा हा संरक्षक देव कालभैरवाचे प्रतीक आहे. काळा धागा म्हणजे कालभैरवाचं रूप मानलं जातं. कालभैरव आपलं रक्षण करतो. तसेच, ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की, शनी ग्रह व्यक्तीच्या जीवनात पायांमार्फत प्रवेश करतो.
ज्योतिषात सांगतात, शनी माणसाच्या आयुष्यात पायातून शिरतो. त्यामुळे, पायांना काळा धागा बांधल्याने कुंडलीतील शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे दोष कमी होऊ शकतात आणि त्यांच्या अशुभ प्रभावापासून सुटका मिळू शकते. पायात धागा बांधला, की शनी, राहू, केतू यांचा वाईट प्रभाव कमी होतो, असं मानलं जातं.
Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
काळा धागा पायात बांधण्याचे फायदे आहेत, म्हणून धागा पायात बांधताना काही नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे.फायदा पाहिजे असेल, तर नियम पण पाळायला पाहिजेत. काळ्या धाग्याला नऊ गाठी असाव्यात, ज्या आपल्या शरीराच्या नऊ दरवाजांचे प्रतीक आहेत. पुरुष आणि मुलांनी काळा धागा त्यांच्या उजव्या पायावर बांधावा.