
Swapna shastr̥a (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
स्वप्नाचा अर्थ :प्रत्येक व्यक्तीला रात्री तिच्या स्वप्नांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी दिसतात. त्यातील काही स्वप्नेही संपूर्ण आठवतात तर काही पूसट आठवतात. प्रत्येक स्वप्नाचा स्वतंत्र अर्थ असतो .तो चांगल्या आणि वाईट स्वप्नाप्रमाणे बदलत असतो .ही स्वप्ने भविष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांची चित्र दर्शवत असतात. साधारणत सकाळी ५ च्या दरम्यान पाहिलेली स्वप्ने खरी होण्याची शक्यता जास्त असते असे म्हटले जाते. जर स्वप्नात आपल्याला एखादी गोष्ट वारंवार दिसत असेल. तर त्याचे शुभ किंवा अशुभ संकेत जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो.जसे काही स्वप्नांमधून आपल्याला धन भरभराटीचे संकेत मिळतात तर काहींमधून येणाऱ्या संकंटांबद्दल संकेत मिळतात.आपण कोणत्या स्वप्नांचा काय अर्थ होतो ते जाणून घेण्यासाठी पुढील ५ गोष्टींबद्द्ल जाणून घेऊया.Swapna shastr̥a
स्वप्नामध्ये जर स्वच्छ वाहणारे पाणी दिसत असल्यास ते शुभ संकेत आहे असे समजले जाते.त्यामुळे आपल्या आयुष्यात असलेल्या मानसिक त्रास आणि आर्थिक समस्या संपणार आहेत .तसेच आयुष्य सुस्थिर होणार आहे. जर तुम्ही स्वतःला स्वच्छ पाण्यात पोहताना पाहिलेत तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळण्याची संकेत देतात .
भारतीय हिंदू धर्मात कमळ हे फूल लक्ष्मी देवीशी संबंधित मानले जाते.असे मानले जातेकी कमळावर लक्ष्मी देवी वास करत असते.त्यामुळे स्वप्नामध्ये कमळांची फूल पाहणे हे चांगले मानले जाते.
लाल गुलाब हे स्वप्नात पाहणे शुभ संकेत मानले जाते.त्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या प्रेम, आनंद,आदर आणि समृद्धी वाढण्याचे लक्षण सामील जाते.
स्वप्नामध्ये पांढरा हत्ती किंवा गाय दिसल्यास हे राजयोगासमान मानले जाते.स्वप्नात पांढरा हत्ती दिसणे याचा अर्थ कामाच्या ठिकाणी आपण नवीन शिखरे गाठणार आहोत असे समजले जाते.
स्वप्नात पांढरी गाय पाहिल्यास किंवा तिला अन्न खाऊ घातल्यास हे स्वप्न आपल्या पुढील जीवनात मधील होणार त्रास कमी होणार आणि आयुष्यात सुख-समृद्धी येणार हे दर्शवते.
स्वप्नामध्ये सतत मंदिर किंवा जळत दिवा दिसल्यास तो देवाचा आशिर्वाद समजला जातो.हे स्वप्न आपल्या सर्व प्रयत्नांना फळ येणार आहे आणि तसेच तुम्ही तुमच्या सर्व समस्यांमधून मधून बाहेर पडणार आहे असे दर्शवते
स्वप्नामध्ये शिवलिंग किंवा भगवान विष्णूचे दर्शन होणे हे आयुष्यातील नवीन बदलांची आणि यशाची सुरवात मानली जाते.
Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
स्वप्नात स्वतःला उचं ठिकाणी चढताना पाहणे किंवा डोंगर चढताना पाहणे हे व्यावसायिक क्षेत्रात नवीन प्रगती आणि यशाचे प्रतीक मानले जाते. स्वतःला झाडावर चढून पाहणे हे देखील स्वप्नशास्त्रानुसार शुभ मानले जाते .तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ लवकरच मिळणार आहे असे दर्शवते
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: स्वप्नशास्त्रानुसार स्वच्छ वाहणारे पाणी दिसणे शुभ मानले जाते. हे मानसिक शांतता आणि आर्थिक समस्यांमधून मुक्तीचे प्रतीक समजले जाते.
Ans: होय. पारंपरिक स्वप्नशास्त्रानुसार डोंगर किंवा झाडावर चढताना दिसणे हे प्रगती आणि मेहनतीचे फळ मिळण्याचे संकेत मानले जातात.
Ans: होय. कमळाचे फूल लक्ष्मी देवीशी संबंधित असल्यामुळे ते धन, समृद्धी आणि सुखाचे प्रतीक मानले जाते.