
फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 9 नोव्हेंबरचा दिवस चढ उताराचा राहणार आहे. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित राहणार आहे. चंद्र आज दिवसरात्र मिथुन राशीमध्ये असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु, शुक्र आणि मंगळ हे तिन्ही ग्रह शुभ स्थितीत असल्याने राजयोग तयार करेल. आर्द्रा नक्षत्रामुळे सिद्धी योग तयार होईल. सूर्य देवाच्या आशीर्वादामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या धाडसाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा होईल. जे लोक धातूशी संबंधित वस्तूंचा व्यवसाय करत आहेत त्यांना आज फायदा होऊ शकतो. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जवळच्या नातेवाईकाला भेटण्याची संधी देखील मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेमधून तुम्हाला फायदा होईल.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्ही तुमचे काम नियोजनानुसार पूर्ण करू शकता. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरम राहील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला कपडे आणि सुखसोयी मिळाल्याने आनंद होईल. लांबचा प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कामाच्या योजना सुरळीतपणे राबवू शकाल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मित्र किंवा नातेवाईकाकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल. सामजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. तुम्ही विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक समस्या सोडवल्या जातील. एखादा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला मदतीचा हात मिळेल. एखाद्याला उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. आज तुम्ही वाहनाची खरेदी करु शकता. घराचे बांधकाम किंवा नूतनीकरणाचे काम वेगवान होईल. कपडे आणि भेटवस्तूंच्या व्यवसायात गुंतलेल्यांच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)