फोटो सौजन्य- pinterest
राक्षसांचा गुरु शुक्र आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचे संक्रमण ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात किंवा एका स्थितीमध्ये असतात त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. शुक्र राशीच्या तूळ राशीत प्रवेशामुळे ‘मालव्य राजयोग देखील तयार होत आहे. तर आता शुक्र ग्रह लवकरच ग्रहांचा राजकुमार मंगळासोबत एक विशेष योग तयार करणार आहे. ज्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. शुक्र-मंगळ ग्रहाचे संयोजन आणि मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
2 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रहाने स्वतःच्या राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश केला. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ किंवा तूळ राशीमध्ये प्रवेश करतो किंवा उच्च राशीत म्हणजेच मीन राशीमध्ये असतो आणि कुंडलीच्या मध्यस्थानी असतो त्यावेळी पंच महापुरुष योगांपैकी एक ‘मालव्य राजयोग’ तयार होतो. हा योग संपत्ती, समृद्धी, प्रेम, भौतिक सुखसोयी आणि कलात्मक क्षमतांचा कारक मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि विलासिता वाढते.
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.46 वाजता सुख आणि समृद्धीचा कर्ता शुक्र आणि उर्जेचे प्रतीक मंगळ एकमेकांपासून 30 अंशांवर असतील त्यावेळी द्विद्ववाद योग’ तयार होणार आहे. काही राशींसाठी हा योग खूप फायदेशीर असणार आहे. हे विशेष संयोजन मेष, धनु आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये संपत्ती, यश आणि समृद्धी आणू शकते.
मेष राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्यामधील ऊर्जा आणि उत्साह वाढेल. धनस्थानावरील मंगळाची दृष्टी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला अधिक जबाबदारीसह पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी ही युती खूप शुभ ठरणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक आणि परिष्कृत होईल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील.
या युतीदरम्यान वृश्चिक राशीच्या लोकांमधील धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध आनंददायी राहतील आणि भागीदारीच्या कामात तुम्हाला यश मिळू शकेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: दोन ग्रह एकत्र राशीत किंवा जवळजवळ येतात. त्याला मंगळ शुक्र युती असे म्हणतात
Ans: मंगळ शुक्राच्या युतीमुळे मालव्य राजयोग आणि द्विद्वदश योग तयार होत आहे
Ans: ही युती मेष, धनु आणि वृश्चिक या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे






