फोटो सौजन्य- pinterest
बुध ग्रहाला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. बुध ग्रहाची हालचाल ज्ञान, बुद्धी, कला, शिक्षण, लेखन आणि संवाद यासारख्या क्षेत्रांवर प्रभाव पाडते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाची स्थिती मजबूत असल्यास त्याच्या व्यक्तिमत्वाचा लोकांवर प्रभाव पडतो. एखादी व्यक्ती आपल्या मेहनतीने जीवनात आणि समाजामध्ये उच्च स्थान प्राप्त करु शकते. पंचांगानुसार, मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी बुध राहू ग्रहाच्या नक्षत्रामध्ये संक्रमण करणार आहे ज्याचा अनेक राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम घडून येणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध हा 7 ऑक्टोबर रोजी आपला मार्ग बदलणार आहे. त्यामुळे तो आज दुपारी 12.21 वाजता स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचे हे संक्रमण 16 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. हा काळ काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. स्वाती नक्षत्राचा अधिपती राहू हा मायावी ग्रह आहे. हे नक्षत्र तूळ राशीत स्थित आहे, ज्यावर राक्षसांचा गुरु शुक्र ग्रह राज्य करतो. बुध ग्रहाचे राहूच्या नक्षत्रात होणारे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे राहूच्या नक्षत्रात होणारे संक्रमण खूप फायदेशीर मानले जाते. बुध ग्रहाचा अधिपती या राशीच्या लोकांवर आशीर्वादाचा वर्षाव करेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता. समाजात तुमचा आदर वाढेल. त्याचसोबत प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
कर्क राशीच्या लोकांवर ग्रहाचा राजकुमार बुध ग्रहाचा आशीर्वाद राहील. जीवन आनंद आणि शांतीने भरलेले असेल. संघर्ष आणि भांडणांपासून मुक्त असतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच तुम्हाला पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. तसेच व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील हा काळ फायदेशीर आहे. शिक्षण आणि भौतिक सुखसोयींच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. या काळामध्ये तुमच्यामधील धार्मिक कार्याची आवड वाढेल. भावंडांसोबतचे त्यांचे संबंध सुधारतील. पती-पत्नीमधील प्रेम वाढेल. कौटुंबिक आनंद कायम राहील. उत्पन्नामध्ये वाढ होईल. त्यासोबतच संपत्तीमध्ये वाढ होईल. या काळामध्ये तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)