Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Transit: दिवाळीनंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची मालमत्ता आणि नोकरीमध्ये होईल प्रगती

दिवाळीनंतर म्हणजेच शुक्रवार, 24 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2025 | 09:56 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीनंतर बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करेल. हे संक्रमण शुक्रवार, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.39 वाजता होईल. बुध ग्रह रविवार, 23 नोव्हेंबरपर्यंत संध्याकाळी 7.58 वाजेपर्यंत वृश्चिक राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाचा कारक बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे सर्व राशींच्या जीवनात मोठे बदल होतील. वृश्चिक ही पाण्याची रास आणि स्थिर रास आहे, जी गूढता, खोली, अंतर्ज्ञान आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. वृश्चिक राशीत बुधाचे होणाऱ्या संक्रमणाचे प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम होणार आहे. बुधाचे होणारे संक्रमण मालमत्ता मिळवण्याची, नवीन नोकरीची आणि प्रगतीची शक्यता निर्माण करणारी असेल. बुध ग्रहाचे वृश्चिक राशीत होणारे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या

मेष रास

बुध ग्रहांचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये आठव्या घरात होत आहे. या काळात गुंतवणूक आणि आध्यात्मिक प्रवृत्तींचे ज्ञान वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक वाद टाळा.

Zodiac Sign: वसुमान योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल अचानक लाभ

वृषभ रास

बुध ग्रहांचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये सातव्या घरात होणार आहे. या काळात वैवाहिक जीवन चांगले राहील. गैरसमज टाळा. व्यावसायिक भागीदारीत नवीन संधी तयार होतील.

कर्क रास

बुध ग्रहांचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये पाचव्या घरात होणार आहे. या काळात अति भावनिकता हानिकारक ठरू शकते. तुम्ही अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी कराल.

कन्या रास

कन्या राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण तिसऱ्या घरात होणार आहे. या काळात तुमच्यामधील संवाद वाढेल. लहान भावंडांशी संबंध सुधारतील. लेखन, माध्यमे, संवाद किंवा प्रवास यातून तुम्हाला फायदा होईल. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा काळ चांगला राहील.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, होतील फायदेच फायदे

तूळ रास

तूळ राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण दुसऱ्या घरात होणार आहे. या काळात आर्थिक बाबतीत लक्ष केंद्रित करावे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तसेच तुम्ही खर्चावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण या राशीत होणार आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढवण्याचा, स्वतःला व्यक्त करण्याचा आणि नवीन संधी स्वीकारण्याचा हा काळ आहे. त्यासोबतच विचारपूर्वक बोलणे आणि संयम बाळगणे फायदेशीर ठरेल.

मकर रास

मकर राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण अकराव्या घरात होणार आहे. याचा संबंध लाभ आणि प्रगतीमध्ये होणार आहे. त्यासोबतच तुमच्यामधील सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि तुम्हाला नवीन संपर्कांचा फायदा होईल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण दहाव्या घरात होणार आहे. त्याचे हे संक्रमण करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी खूफ फायदेशीर आहे. बॉस आणि वरिष्ठांशी संबंध सुधारतील. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास

मीन राशीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहांचे हे संक्रमण नवव्या घरात होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या नशिबावर आणि उच्च शिक्षणावर सकारात्मक परिणाम करेल. या काळात लांब प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरतील. धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञानात तुमची आवड वाढेल. शिक्षक आणि तुमच्या वडिलांशी संबंध अधिक दृढ होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh transit after diwali mercury will transit into scorpio people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति
1

Chanakya Niti: महिलांची बुद्धी पुरुषांपेक्षा चारपट अधिक? काय सांगते चाणक्य नीति

Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा तिलक  का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या
2

Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा तिलक का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Sheetala Saptami: 10 की 11 मार्च नेमकी कधी आहे शीतला सप्तमी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
3

Sheetala Saptami: 10 की 11 मार्च नेमकी कधी आहे शीतला सप्तमी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Sant Tukaram Maharaj beej: संत तुकाराम बीज म्हणजे काय? जाणून घेऊया महत्त्व आणि कसा साजरा होतो हा सोहळा
4

Sant Tukaram Maharaj beej: संत तुकाराम बीज म्हणजे काय? जाणून घेऊया महत्त्व आणि कसा साजरा होतो हा सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.