फोटो सौजन्य- pinterest
या काळात कामात व्यत्यय येऊ शकतो आणि जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. त्याचबरोबर, आपले निर्णय विचारपूर्वक घ्यावेत आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नये, असा सल्ला दिला जातो. बुधाच्या वक्री गतीमुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे ते जाणून घेऊया
बुध वक्रीवेळी कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवासाची शक्यता असून, कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या वरिष्ठांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. गुंतवणुकीच्या संधीही हातातून निसटू शकतात. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते.
तूळ राशीच्या लोकांनी बुधाच्या वक्री गतीमुळे तुमचे वेळापत्रक अधिक व्यस्त होऊ शकते. तुम्हाला कामासाठी अधिक वेळा प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान तुमच्या वस्तू आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांनी बुध वक्रीदरम्यान आपल्या विरोधकांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात. आर्थिक बाबी आणि भौतिक सुखसोयींसंबंधीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या आईच्या ढासळत्या प्रकृतीमुळेही तुम्हाला चिंता वाटू शकते. घाईघाईत केलेली गुंतवणूक किंवा अनावश्यक खर्चामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. कोणत्याही कामात शॉर्टकट घेणे किंवा नियमांचे उल्लंघन करणे टाळावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






