फोटो सौजन्य- pinterest
आज 28 सप्टेंबर रविवारचा दिवस आणि अश्विन महिन्याच्या शुद्ध सहावा दिवस म्हणजे नवरात्रीमधील षष्ठी तिथी आहे. आजचा दिवस कात्यायनी देवीला समर्पित आहे. आज रविवार असल्याने आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. आज सूर्य कन्या राशीमध्ये संक्रमण करेल आणि बुधादित्य योग तयार होईल. तसेच वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करेल. बुधादित्य योग आणि देवी कात्यायनीच्या आशीर्वादामुळे आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. सामाजिक कार्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती अनुकूल राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. मालमत्तेशी संबंधित कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश लाभेल. जर तुमचे काम घर बांधणीशी संबंधित असल्यास तुमचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचे मन धर्म आणि अध्यात्मावर अधिक केंद्रित करेल. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. तुमच्या आर्थिक योजना यशस्वी होतील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण झाल्याने तुम्ही आज खूश व्हाल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मालमत्तेसंबंधित वाद सोडवण्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांना आज सन्मान किंवा पद मिळू शकते. तसेच तुम्ही धार्मिक कार्यात देखील सहभागी होऊ शकतात.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज नशिबाची साथ लाभेल. तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि भावंडांकडूनही पाठिंबा मिळेल. काही प्रलंबित काम पूर्ण झाल्याने तुम्ही खूश असाल. तसेच तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. सौंदर्यप्रसाधनांमध्ये गुंतलेल्या लोकांचा आजचा दिवस आनंदात जाईल. मालमत्तेशी संबंधित कामातून फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी प्रवासाला जात असाल तर तुमचा प्रवास यशस्वी आणि आनंददायी होईल. तुमच्या कुटुंबातील वडीलधारी आणि ज्येष्ठ सदस्यांकडून तुम्हाला लाभ आणि पाठिंबा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)