फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आजच्या रविवारच्या दिवसाचा ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि मूलांक 4 असणाऱ्या लोकांना मोठ्या संधी मिळू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहणार नाही. यामुळे तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्वतः शांत राहून कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. कामात लक्ष लागणे कठीण होईल. विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत घाईमध्ये निर्णय घेऊ नका अन्यथा नुकसान होऊ शकते.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस मिश्रीत राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील. वाद वाढू शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात धाडसी निर्णय घेण्यापासून सावध राहावे.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागू शकते. त्यासोबतच तुम्हाला मोठी संधी उपलब्ध होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 5 असलेले लोक कामामध्ये व्यस्त राहू शकता. जास्त मेहनत घेतल्याने तुम्हाला थकवा जाणवू शकतो. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. यामुळे तणाव दूर होईल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला संयम बाळगावा हवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबामध्ये मुलांच्या स्वभावात काही बदल होताना दिसतील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. कुटुंबामध्ये सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)