फोटो सौजन्य- pinterest
शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवी नवरात्रीमधील देवीच्या नऊ रुपांमधील हे एक रुप आहे. कात्यायनीच्या पूजेसाठी हा दिवस समर्पित आहे. मान्यतेनुसार, कात्यायनीकडे देवीकडे सुवर्ण तेज आहे. ज्याचे केवळ दिव्य दर्शन भक्ताला आनंद आणि सौभाग्य प्रदान करते. जो व्यक्ती नवरात्रीमध्ये कात्यायनी देवीची पूजा करतो, जप, ध्यान आणि उपवास करतो त्या व्यक्तीवर देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे. तसेच या व्यक्तीची रोग, दुःख आणि भीतीपासून सुटका होते असे म्हटले जाते. कात्यायनीची पूजा पद्धत, मंत्र आणि महत्त्व जाणून घ्या
मान्यतेनुसार, देवीचे सहावे रुप म्हणजे कात्यायनी. या देवीचे रुप एक दिव्य तेज आहे. ती सोन्यासारखी तेजस्वी आहे. चतुर्भुज देवी कात्यायनी एका हातात वरदान मुद्रेत आणि दुसऱ्या हातात अभय मुद्रेत धरलेली आहे. तिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे. ही देवी सिंहावर स्वार आहे.
कात्यायनी देवीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे. देवीची पूजा करताना ईशान्य दिशेकडे एका चौरंगावर लाल कापड पसरवून त्यावर कात्यायनी देवीचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करा. त्यानंतर त्यावर पवित्र पाणी शिंपडा. त्यानंतर देवीला पिवळ्या रंगांची फुले आणि वस्त्र अर्पण करा. कारण देवीला पिवळा रंग खूप आवडतो. धूप, दिवे, फळे, फुले, रोली (गोड भात) आणि पिवळी मिठाई इत्यादी गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. देवीची पूजा करुन झाल्यानंतर ओम देवी कात्यायनी नम: या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर देवीची आरती करुन घेऊन तिला नैवेद्य अर्पण करुन तो सर्वांना द्यावा.
हिंदू मान्यतेनुसार, नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीला पिवळी फळे किंवा पिवळी मिठाई या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा.
कात्यायनी महामाये, महायोगिन्यधीश्वरी.
नन्दगोपसुतं देवी, पति मे कुरु ते नमः.
असे मानले जाते की, कात्यायनी देवीची पूजा केल्याने सर्व संकटांपासून सुटका होते आणि व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला लग्नामध्ये अडथळे येत असतील तर त्या व्यक्तीने या दिवशी हळद पावडर आणि पिवळी फुले अर्पण कात्यायनी देवीला अर्पण करावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)