फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी स्वामी ग्रह शनि मीन राशीमध्ये स्थित आहे. जो गुरु सोबत केंद्र योग तयार करत आहे. चंद्र शुक्रासह सूर्याची राशी सिंह राशीत दिवसरात्र संक्रमण करणार आहे. सूर्य आणि बुध चंद्राच्या दुसऱ्या घरात असल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. तर चंद्र शुनाफ योग तयार करेल. चंद्राचा शुक्राशी संबंध असल्याने देखील कालयोग तयार होईल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामुळे एक सधी योग तयार होईल. या शुभ योगाच्या प्रभावामुळे आजचा दिवस मिथुन, कर्क, कन्या, धनु आणि मकर राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. शनिवारचा दिवस कोणत्या राशीसाठी फायदेशीर राहील, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्ही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असल्यास तुम्हाला ते परत मिळू शकतात.
कर्क राशीचे लोक आज कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. तुमच्या व्यवसायातील उत्पन्न वाढेल. या काळात तुमचा नोकरीमधील प्रभाव आणि आदर वाढेल. सामाजिक वर्तुळात सक्रिय असल्याने तुमचा व्याप वाढू शकतो आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद राहील. तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीची मदत घेता येईल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. स्पर्धा किंवा परीक्षेत सहभागी होणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. तुमच्या बौद्धिक क्षमता आणि चातुर्य यांचाही तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.
धनु रासीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तुम्हाला व्यावसायिक भागीदारांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. म्ही नियोजित केलेला एखादा महत्त्वाचा प्रकल्प मित्र किंवा नातेवाईकाच्या मदतीने पूर्ण होऊ शकतो. वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता. कुटुंबासह बाहेर फिरायला जाऊ शकता.
मकर राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला कधीही कल्पना न केलेले यश मिळू शकेल. ज्या लोकांना व्यवसायात वाढ करायची आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. आजचा संध्याकाळचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाकडून आणि वडिलांकडून पाठिंबा मिळू शकतो. कुटुंबामध्ये आज अनुकूल वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)