फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 7 सप्टेंबरचा दिवस. आजपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे. चंद्राचे संक्रमण आज दिवसरात्र कुंभ राशीमध्ये होणार आहे. तसेच सूर्य आणि बुध यांची युती असल्यामुळे आज बुधादित्य योग देखील तयार होईल. यावेळी गुरु आणि चंद्र नवम पंचम योग तयार करणार आहे. विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुम्हाला कुटुंब आणि वडिलोपार्जित मालमत्तेतूनही आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात परस्पर सौहार्द असल्याने तुमचा दिवस चांगला जाईल. मित्राच्या मदतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या हुशारी आणि अनुभवाचा चांगला फायदा होईल. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात विशेष यश मिळेल. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात विशेष यश मिळेल. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला खूप मेहनत घेतल्यास अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला हवे असलेले काहीतरी मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. तुम्ही आर्थिक योजनांमध्ये यशस्वी व्हाल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस खूप चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. तुम्हाला आरामाचे साधन मिळाल्याने आनंद होईल. सामाजिक कार्य किंवा राजकीय कार्यात गुंतलेल्या लोकांचा प्रभाव आणि आदर वाढल्याने तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. व्यापारी आणि किराणा व्यवसायिकांची अपेक्षेपेक्षा जास्त कमाई होऊ शकते.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. बुद्धिमत्तेचा आणि कार्यक्षमतेचा तुम्हाला जास्त फायदा होईल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे राबवू शकाल त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. जोडीदाराकडून आणि सासरच्या लोकांकडून लाभ मिळू शकेल. मात्र मुलांबाबत थोडी चिंता जाणवू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)