फोटो सौजन्य- pinterest
आजचा शनिवारचा दिवस शनि देवाला समर्पित आहे. चंद्र दिवसरात्र मेष राशीमध्ये संक्रमण करत असल्याने शनि आपले वर्चस्व गाजवेल. शनि चंद्रापासून 12 व्या घरात संक्रमण करेल तर मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आज शनिसोबत केंद्र योग तयार करेल. त्याचसोबत सूर्य पुष्प नक्षत्रात प्रवेश करेल. त्यामुळे कर्क राशीमध्ये सूर्य आणि बुध यांची युती होऊन बुधादित्य योग तयार होईल. आजचा दिवस भगवान शनिदेवांना समर्पित असल्याने आजच्या दिवसाला अधिक महत्त्व आहे. काही राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामामध्ये यश मिळेल. बुधादित्य योग आणि शनि देवाच्या कृपेने मिथुन राशीसह या राशीच्या लोकांचा आजचा शनिवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना व्यवसायात चांगला फायदा मिळेल. तुम्ही सर्व निर्णय आत्मविश्वासाने निर्णय घ्यावे. तुम्ही कोणाच्याही बोलण्याने प्रभावित होऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध चांगले राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअर आणि व्यवसायामध्ये आर्थिक फायदे होतील. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुमची प्रशंसा करतील. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात आनंदी राहील. भावंडांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी नवीन बदलांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांची इच्छित ठिकाणी बदली होईल. कुटुंबाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकतात. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. नात्यामध्ये गोडवा कायम टिकून राहील.
धनु राशीच्या आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. सर्जनशील कामातून तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. चित्रपट, गायन, नृत्य इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. या लोकांची प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा. पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. अध्यापन, कोचिंग, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी फायदेशीर राहू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)