फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 19 जुलै रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी येत आहे. या दिवशी भरणी नक्षत्र असल्याने शूल योग तयार होत आहे. या योगाला ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. यावेळी शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. दरम्यान ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहे.
पंचांगानुसार, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होऊन 12.55 वाजेपर्यंत राहील आणि राहुकाल सकाळी 09.01 वाजता सुरू होऊन 10.44 वाजेपर्यंत राहील.
ज्योतिषशास्त्रामध्ये या योगाला अशुभ योग मानले जाते. ज्यामध्ये सातही ग्रह तीन राशींमध्ये स्थित असतात. या योगात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे कारण त्यामुळे जातकाला त्रास होऊ शकतो.
शूल म्हणजे ‘भेदक शस्त्र’. या योगात केलेली कोणतीही कृती, जरी यशस्वी झाली तरी, ती त्या व्यक्तीच्या जीवनात दीर्घकालीन दुःख निर्माण करू शकते.
शूल योगाचा स्वामी राहू असल्याने भगवान शिव राहूचे वाईट परिणाम कमी करण्यास मदत करतात. मान्यतेनुसार भगवान शिवाची नियमित पूजा केल्याने शूल योगाचे वाईट परिणाम कमी करण्यास मदत होते. हे प्रभाव कमी करण्यासाठी दररोज भगवान शिवाला पाणी अर्पण करुन महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. तसेच महादेवाना बेलाच्या पानांचा नैवेद्य दाखवल्याने ते प्रसन्न होतात. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म अशुभ योगामध्ये झाला असल्यास अशा लोकांनी शूलयोग शांती पूजा करावी.
शनिवारचे व्रत केल्याने शनिच्या साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी हे व्रत केले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या व्रताची सुरुवात करण्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय, शुक्ल पक्षाच्या कोणत्याही शनिवारी हे व्रत सुरू करता येते. असे मानले जाते की, सलग 7 शनिवार हे उपाय केल्याने शनिच्या कोपापासून मुक्तता होऊन व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी ब्रम्ह मुहूर्तावर उठून आंघोळ झाल्यानंतर शनि देवाची पूजा करावी. त्यानंतर शनिदेवाची मूर्ती किंवा शनियंत्र ठेवा आणि शं शैश्चराय नम:, सूर्य पुत्राय नम: यासारख्या शनि मंत्रांचा जप करा. तसेच शनिवारी शनिदेवाची पूजा करताना काळी उडीद डाळ खिचडी अर्पण करुन आरती करावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)