
फोटो सौजन्य- pinterest
मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथी म्हणजे सहाव्या दिवशी चंपाषष्ठीचे व्रत पाळले जाते. हा दिवस भगवान कार्तिकेय आणि खंडोबा यांना समर्पित आहे. या दिवशी विशेष प्रार्थना, उपवास आणि सूर्यपूजा करणे महत्त्वाची मानली जाते. चंपाषष्ठीचा सण शंकराचा अवतार असलेल्या खंडोबाच्या दैत्यावरील विजयाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. पौराणिक कथेनुसार, मणी आणि मल्ल नावाच्या दोन क्रूर दैत्यांनी त्रिलोकात हाहाकार माजवला होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. देव, ऋषी आणि सामान्य जनता त्यांच्या अत्याचाराला त्रासले होते. त्यावेळी मार्तंड भैरवाच्या रुपामध्ये शंकरानी अवतार घेऊन या दैत्यांविरुद्ध घनघोर युद्ध केले. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून झाले होते शेवटी ते षष्ठी तिथीला संपुष्टात आले. चंपाषष्ठी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि तळी भरण्याची पद्धत जाणून घ्या
आज बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी षष्ठी तिथीची सुरुवात 25 नोव्हेंबर रोजी रात्री 10.55 वाजता झाली आहे. तर या तिथीची समाप्ती 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.55 वाजता होणार आहे. मात्र चंपाषष्ठीचा सण 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. भक्त उपवास करतात, पूजा करतात आणि खंडोबाची पूजा करुन तळी भरण्याची देखील परंपरा आहे.
चंपा षष्ठीचा सण हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी केलेल्या पूजेमुळे पापांचे निर्मूलन करण्यास आणि जीवनात सुख आणि शांती आणण्यास मदत करतात. या दिवशी सूर्य देवाची विशेष पूजा देखील केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि सूर्यदेवाची प्रार्थना करावी. शंकराचे ध्यान करावे. तसेच शिवलिंगावर दूध, पाणी आणि गंगाजल अर्पण करावे. नंतर महादेवांना चंपाची फुले अर्पण करावी. श्रद्धेनुसार महादेवांना हे फूल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की असे केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते आणि पुण्य प्राप्त होते. अनेक ठिकाणी, चंपा षष्ठीची कथा आणि परंपरा स्कंद षष्ठी आणि खंडोबा देव यांच्याशी देखील जोडल्या जातात.
खंडोबांनी मल्ल दैत्याचा वध केला आणि मणी दैत्याला क्षमा करुन त्याला आपल्यासोबत राहण्याचे वरदान देण्यात आले. या विजयाच्या आनंदाने ऋषिमुनींनी सदानंदाचा येळकोट असा जयजयकार केला. याच विजयाचे आणि आनंदोत्सवाचे प्रतीक म्हणून घरोघरी तळी भरण्याची परंपरा आहे.
यासाठी घरातील देवासमोर आसन मांडून तळी भरण्यासाठी 5 पुरुष बसतात. त्यामध्ये लहान मुलं, तरुण किंवा माणसं सुद्धा असतात. एका ताम्हणात किंवा मोठ्या तबकात भंडारा पसरवला जातो त्यावर कलश ठेवला जातो. त्यामध्ये विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याची वाटी असते. या कलशाला खंडोबाचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर विड्याची पाने, खोबरं आणि भंडारा खंडोबाला अर्पण केला जातो. आरती आणि पूजा झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य डोक्यावर टोपी परिधान करुन ही तळी ठेवतात.
यानंतर सदानंदाचा येळकोट । येळकोट । येळकोट । जय मल्हार असा जयघोष करुन तळी तीन वेळा खाली वर करुन उचलली जाते. यावेळी जयघोष म्हणजे खंडोबाच्या विजयाच्या आणि जयघोषाचा प्रतीक म्हणून ओळखले जाते. विधी झाल्यानंतर तळीतील भंडारा सर्व भक्तांच्या कपाळी लावला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कुलधर्म आणि कुलाचाराप्रमाणे वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. चातुर्मासामध्ये निषिद्ध मानले जाणारे वांग आणि कांदा या दिवशी खंडोबाला अर्पण करण्याची परंपरा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चंपाषष्टी बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: चंपाषष्ठीचे व्रत खंडोबाला समर्पित आहे
Ans: खंडोबांनी मल्ल दैत्याचा वध केला आणि मणी दैत्याला क्षमा करुन त्याला आपल्यासोबत राहण्याचे वरदान देण्यात आले. या विजयाच्या आनंदाने ऋषिमुनींनी सदानंदाचा येळकोट असा जयजयकार केला. याच विजयाचे आणि आनंदोत्सवाचे प्रतीक म्हणून घरोघरी तळी भरण्याची परंपरा आहे.