Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड; कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?

भारतात असं एकमेव ठिकाण आहे जिथलं महादेवाचं मंदिर अत्यंत रहस्यमय तर आहेच पण या शिवपिंडींच गुढ अजूनही विज्ञानाला देखील उलगडलेलं नाही. कोणतं आहे हे मंदिर चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2026 | 01:42 PM
भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड; कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?
Follow Us
Follow Us:
  • भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड;
  • कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?
शिवपिंड म्हटली की ती दगडाची, वाळूची असते हे सर्वसाधारण आपल्याला माहित असतं.पण कधी ऐकलंय का की भस्मापासून शिवपिंड बनली ? भारतात असं एकमेव ठिकाण आहे जिथलं महादेवाचं मंदिर अत्यंत रहस्यमय तर आहेच पण या शिवपिंडींच गुढ अजूनही विज्ञानाला देखील उलगडलेलं नाही. कोणतं आहे हे मंदिर चला तर मग जाणून घेऊयात.

असं म्हणतात की, काही गोष्टी या लॉजिक आणि मॅजिकच्या पलिकडे असतात. मात्र अंधश्रद्धा म्हणायचं तर तसंही नाही. फक्त विज्ञानाला याची उकल झालेली नसते इतकंच. तर गोष्ट अशी की., कर्नाटकमध्ये असं एकमेव मंदिर आहे जिथली शिवपिंड पूर्णत: भस्मापासून बनलेली आहे आणि शेकडो वर्ष होऊन देखील ही शिवपिंड अगदी जशीच्या तशी आहे. यामागे देखील एक कारण आहे. तर आख्यायिका अशी की, कर्नाटकातीस पांगळा गावात भस्मापासून बनलेल्या या शिवपिंडीतून एक सुवास कायम दरवळत असतो. असं म्हणतात की हे भस्म कायमच ओलसर जाणवतं. तिकडे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या मते या शिवपिंडीच्या भोवती एक सकारात्मक शक्ती असल्याचा भास होतो. याबाबतचं रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञानांनी तिथल्या भस्माची तपासणी केली. त्यावेळी एक आश्चर्यकारक सत्य समोर आलं.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना करा प्रसन्न, शिवलिंगावर त्रिपुंड व पंचामृत अभिषेकासह करा ‘हे’ उपाय

सहसा सर्वसाधारण भस्म वाऱ्याने उडून जातं. मात्र हे भस्म वर्षानुवर्ष तसंच टिकून आहे. असं भस्म टिकून राहण्यासाठी त्यात काही द्रव्य पदार्थ असतात. पण ते नेमके कोणते ते आजपर्यंत कोणालाही कळलं नाही. हे मंदिर पांगळा गावातील पांगळा या नदीकिनारी आहे. स्थानिक कथेनुसार, पूर्वी या परिसरात एक साधू कठोर तपश्चर्या करत होते. ते दररोज यज्ञ करून त्यातून निघालेलं पवित्र भस्म (विभूती) शिवपूजेसाठी वापरत असत. एके दिवशी त्या भस्माचा ढीग हळूहळू शिवलिंगाच्या आकारात स्थिरावला. त्यानंतर इथे भस्म साचून शिवपिंड तयार झाली अशी एक दंतकथा सांगितली जाते.

याचबरोबर या शिवपिंडींचं वैशिष्ट्यं म्हणजे या शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण केल्यावर ते पूर्णपणे विरघळत नाही.त्याचबरोबर या ठिकाणी विभूती अर्पण करण्याची परंपरा येथे विशेष महत्त्वाची मानली जाते. असं म्हटलं जातं की, विभूती म्हणजे नश्वरतेचं प्रतीक. भगवान शिव भस्म धारण करतात, कारण जीवन क्षणभंगुर आहे, हा संदेश यातून मिळतो. त्यामुळे विभूतीपासून बनलेला शिवलिंग हा वैराग्य, शुद्धता आणि आत्मज्ञानाचं प्रतीक मानला जातो. आज देखील याचं वैज्ञानिक कारण कळू शकलं नाही पण येणाऱ्या भाविकांच्या मते या ठिकाणी दर्शन घेतल्यावर मानसिक शांतता आणि सकरात्मक ऊर्जा जाणवते.

जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: The only shiva idol in the country made of bhasma mysterious shiva temple in pangla karnataka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Shiva
  • navrashtra news

संबंधित बातम्या

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व
1

International Yoga Day: गीता, उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानात योगाचे काय आहे महत्त्व

Jyotiba Story: जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घ्या
2

Jyotiba Story: जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घ्या

Brahmavaivarta Purana: ब्रह्मवैवर्त पुराणात श्रीकृष्णांना परब्रह्म का मानले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Brahmavaivarta Purana: ब्रह्मवैवर्त पुराणात श्रीकृष्णांना परब्रह्म का मानले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Ramayana Story: पर्यावरण संकटाच्या काळात रामायणाची शिकवण का महत्त्वाची आहे? जाणून घ्या
4

Ramayana Story: पर्यावरण संकटाच्या काळात रामायणाची शिकवण का महत्त्वाची आहे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.