Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

एक आगळी वेगळी प्रथा म्हणजे गावपळण. कोकणात जशी भुतं प्रसिद्ध आहेत तशीच काही रुढी परंपरा आहेत ज्यामुळे कोकणाची एक वेगळी ओळख जाणवते. काय आहे नेमकी ही प्रथा चला तर मग जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2026 | 03:28 PM
वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा
Follow Us
Follow Us:
  • वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर
  • गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा
असं म्हणतात की,   मैलामैलांवर भाषा बदलचे तशीच त्या त्या गावची प्रथा परंपरा आणि रिती रिवाज देखील बदलतात. अशीच एक आगळी वेगळी प्रथा म्हणजे गावपळण. कोकणात जशी भुतं प्रसिद्ध आहेत तशीच काही रुढी परंपरा आहेत ज्यामुळे कोकणाची एक वेगळी ओळख जाणवते. काय आहे नेमकी ही प्रथा चला तर मग जाणून घ्या.

वर्षातून गावातील सर्वजणं आपल्या गुरांना पाळीव प्राण्यांना घेऊन काही दिवसांसाठी गाव सोडतात. गावाच्या वेशीबाहेर राहतात त्याला म्हणतात गावपळण. ही प्रथा सहसा सिंधुदुर्गात पाहायला मिळते. आता ही नेमकी प्रथा आहे तरी काय ? तर याबाबत दंतकथा सांगितली जाते. गोष्ट अशी की, गावदेवतेला कौल लावला जातो आणि एक तारिख देवाच्या इच्छेने ठरवली जाते. त्या दिवशी गावकरी आपल्या मुलाबाळांना, गुरांना आणि पाळीव प्राण्यांना घेऊन गावची वेस सोडतात. हे दोन ते तीन किंवा कधी कधी त्याहून जास्त दिवस गावकरी गाव सोडून दुसऱ्या गावात राहता किंवा ज्यांचं परगावी कोणी नाही अशी माणसं गावच्या वेशीबाहेर राहतात.

यामागे आख्यायिका अशी की, गावातील देवतांनी इतर शक्तीबरोबर करार केलेला असतो त्यामुळे या दिवसात गावात सजीवांचं वास्तव्य अमान्य असतं. यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गावपळण आणि दुसरं म्हणजे देवपळण. गावपळण म्हणजे देवाचा कौल लागल्यानंतर जेव्हा फक्त गावकरी बाहेर पडतात ते गावपळण आणि दुसरं म्हणजे देवपळण. देवपळण पद्धतीत देवाचा कौल लागल्यानंतर गावकऱ्यांबरोबर गावाची वेस ओलांडताना देवसुद्धा वेस ओलांडतात.

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करायचा झाला तर, यामागे देखील एक अर्थ आहे. गाव म्हणजे काय तर ठराविक माणसं एका ठिकाणी राहतात आणि कालांतराने त्यांची ओळख वाढत जाते आणि शेजार धर्म घट्ट होतो, हाच या प्रथेमागचा हेतू आहे. गावपळण प्रथेमुळे गावातले सर्व गावकरी एकत्र वेशीबाहेर राहतात. या निमित्ताने एकत्र जेवण, एकत्र गप्पा गोष्टी होतात. माणसामाणसांमधील हेवेदावे यामुळे नाहीसे होतात. तसंच गावातील गावपण राखलं जातं गावाची एकी यातून अधिक घट्ट होते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या सुरु असलेली ही परंपरा आजतागायत सुरु आहे. आणि प्रथा आजही गावकरी अगदी आनंदाने साजरी करतात.

भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड; कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?

 

Web Title: Once a year the entire village goes on vacation gavpalan is a wonderful tradition in konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Devgad
  • hindu religion
  • Kokan News

संबंधित बातम्या

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारता येतो का? उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट उत्तर
1

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारता येतो का? उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट उत्तर

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
2

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

Sant Kanhopatra: पंढरपूरच्या विठ्ठलभक्त संत कान्होपात्रा कोण होत्या? विठ्ठलभक्तीमध्ये लीन झालेल्या कान्होपात्रांची प्रेरणादायी कथा
3

Sant Kanhopatra: पंढरपूरच्या विठ्ठलभक्त संत कान्होपात्रा कोण होत्या? विठ्ठलभक्तीमध्ये लीन झालेल्या कान्होपात्रांची प्रेरणादायी कथा

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय
4

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.