Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: एकांतात राहूनही सुखी असतात हे लोक, जाणून घ्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलेली कारणे

आचार्य चाणक्यांच्या मते, काही लोक एकांतात राहूनही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत, शांत आणि समाधानी जीवन जगतात. अशा लोकांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि विचारांची स्पष्टता अधिक असते, असे चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलेले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 21, 2026 | 03:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • एकांतात राहूनही सुखी असतात हे लोक
  • चाणक्य नीतीमध्ये सांगितलेली कारणे
 

 

 

आजच्या वेगवान जीवनात, गर्दीत असूनही बहुतेक लोकांना एकटेपणा जाणवतो. सोशल मीडियावर हजारो मित्र असूनही त्यांचे मन अस्वस्थ राहते, तर काही लोक एकटे असतानाही शांत, समाधानी आणि आनंदी दिसतात. यामुळे लोकांना अनेकदा आश्चर्य वाटते की, एखादी व्यक्ती आधार किंवा सततच्या सोबतीशिवाय इतकी आनंदी कशी असू शकते. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीमध्ये या प्रश्नाचे एक सखोल उत्तर दिले आहे. त्यांच्या मते, एकटेपणा हे नेहमीच दुर्बलतेचे लक्षण नसते; उलट, अनेकदा हाच काळ माणसाला सर्वात सामर्थ्यवान बनवतो.

जे लोक स्वतःला ओळखतात, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात आणि इतरांवर अत्याधिक अवलंबून राहणे टाळतात, ते जीवनात अधिक शांत आणि संतुलित असतात. चाणक्याच्या विश्वासानुसार खरा आनंद आतून येतो, बाह्य जगातून नाही. याच कारणामुळे काही लोक एकटे राहिल्यानंतरही खचत नाहीत, उलट अधिक कणखर बनतात.

असे लोक स्वतःशी नाते जोडायला शिकतात

चाणक्यांच्या मते, जी व्यक्ती स्वतःला ओळखायला शिकते, तिला सतत कोणाच्यातरी सोबतीची गरज नसते. अशा व्यक्ती आपल्या उणिवांपासून दूर पळत नाहीत किंवा आपल्या सामर्थ्याबद्दल बढाई मारत नाहीत. त्यांना स्वतःसोबत वेळ घालवायला आवडते. असे काही लोक आहेत, ज्यांना मोकळा वेळ मिळाला की, ते पुस्तक वाचायला, काहीतरी नवीन शिकायला किंवा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला लागतात. फोन किंवा आजूबाजूला माणसं नसताना ते खूप सहज वावरताना दिसतात. खरं तर, इतरांना खूश करण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर त्यांचं अधिक लक्ष असतं. ही सवय त्यांना आतून सामर्थ्यवान बनवते.

Chanakya Niti: तणावातही लोक हसतमुख कसे राहतात? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहू नका

अनेक लोक आपला आनंद इतरांच्या स्तुतीशी जोडतात. कोणी त्यांची स्तुती केली तर ते आनंदी होतात आणि कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ते दुःखी होतात. पण चाणक्य म्हणतात की, शहाण्या माणसाला स्वतःची किंमत माहीत असते. जे एकटे असतानाही आनंदी असतात, ते इतरांकडून सतत आदर किंवा लक्ष मिळण्याची अपेक्षा करत नाहीत.

नात्यांचे महत्त्व ओळखणे

जे लोक एकटे आनंदी असतात, ते नातेसंबंधांपासून दूर राहत नाहीत. त्यांना कुटुंब आणि मित्रांचे महत्त्व समजते, पण ते आपला संपूर्ण आनंद एका व्यक्तीवर अवलंबून ठेवत नाहीत. ही मानसिकता त्यांना अधिक मानसिकदृष्ट्या स्थिर बनवते. वास्तविक जीवनात अनेकदा असे दिसून येते की, नातेसंबंध तुटल्यानंतर किंवा एखादी जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर काही लोक पूर्णपणे खचून जातात. काही लोक दुःखी असूनही हळूहळू सावरतात.

Chanakya Niti: स्त्रियांच्या या गुणांमुळे ठरतात विशेष, जाणून घ्या चाणक्यांनी सांगितलेली कारणे

मन शांत कसे ठेवावे

चाणक्य नीतीनुसार, शांत मनाची व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळू शकते. आनंदी व्यक्ती अनावश्यक वादविवाद, मत्सर आणि नकारात्मक वातावरणापासून दूर राहतात. अशा व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. सकाळचा चहा, आवडते गाणे, एकटे फिरायला जाणे किंवा आपल्या स्वप्नांवर काम करणे या गोष्टी त्यांना समाधान देतात. या छोट्या सवयी त्यांच्या जीवनात संतुलन निर्माण करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाणक्य नीतीनुसार एकांतात राहणारे लोक आनंदी का असतात?

    Ans: चाणक्यांच्या मते अशा लोकांना स्वतःसोबत वेळ घालवायला आवडतो. ते मानसिकदृष्ट्या मजबूत असतात आणि छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधू शकतात.

  • Que: एकटे राहणे म्हणजे दुःखी असणे का?

    Ans: नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक एकांतात अधिक शांत, समाधानी आणि उत्पादक राहतात.

  • Que: एकांतप्रिय लोकांमध्ये कोणते गुण असतात?

    Ans: चाणक्य नीतीनुसार आत्मविश्वास, स्वावलंबन, संयम, विचारांची स्पष्टता आणि भावनांवर नियंत्रण हे गुण अशा लोकांमध्ये अधिक दिसून येतात.

Web Title: Chanakya niti these people stay happy even in solitude know the reasons mentioned in chanakya teachings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व
1

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या
2

Shivlilamrut: शिवलीलामृतच्या १३व्या अध्यायातील दक्षयज्ञापासून शिव-पार्वती विवाहापर्यंतची संपूर्ण कथा जाणून घ्या

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ
3

Budhaditya Yoga: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तयार होत आहे बुधादित्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार सुख-संपत्तीचा लाभ

Solar Eclipse: अमावस्या-पौर्णिमेलाच का लागते ग्रहण? जाणून घ्या यामागचं खगोलशास्त्रीय कारण
4

Solar Eclipse: अमावस्या-पौर्णिमेलाच का लागते ग्रहण? जाणून घ्या यामागचं खगोलशास्त्रीय कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.