Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dattaguru : गुरुचरित्र पारायणाचा मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो? काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान ?

दत्तसंप्रदाय असो की नवनाथ संप्रदाय या दोन्हीमध्ये साम्य हेच की गुरुला आदाराचं स्थान दिलं जातं. गुरु म्हणजे परमेश्वराचा अंश ही या संप्रदायाची शिकवण आहे. याच गुरुच्या प्रेरणेतून लिहिला गेलेला ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 02, 2025 | 06:17 PM
Dattaguru : गुरुचरित्र पारायणाचा मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो? काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान ?
Follow Us
Close
Follow Us:
  • गुरुचरित्र पारायणाचा मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो?
  • काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान ?
  • काय आहे पारायणाचे परिणाम ?
दत्तसंप्रदाय असो की नवनाथ संप्रदाय या दोन्हीमध्ये साम्य हेच की गुरुला आदाराचं स्थान दिलं जातं. गुरु म्हणजे परमेश्वराचा अंश ही या संप्रदायाची शिकवण आहे. याच गुरुच्या प्रेरणेतून लिहिला गेलेला ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. दत्तनवरात्र काळात गुरुचरित्राचे पारायण भाविक मोठ्या श्रद्धेने करतात. गुरुचरित्र हे श्रीगुरुदेव दत्तांच्या जीवनचरित्रावर आधारित पवित्र ग्रंथ आहे. खरंतर पारायणाची प्रथा एका रात्रीत किंवा एका क्षणी सुरु नाही झाली तर भक्तीपरंपरा, गुरु-शिष्य परंपरा आणि दत्तसंप्रदायातील शिष्यांमुळे पारायणाची हळूहळू विकसित झाली. असं असलं तरी ज्ञानदेव, महानुभाव पंथ, नाथपंथ आणि श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामींच्या काळापासून “गुरुचरित्र ऐकणं, वाचणं, त्याचं स्मरण करणं” ही एक साधना मानली जाऊ लागली आणि हळूहळू पुढील शिष्यांच्या पिढ्यांमध्ये गुरुचरित्राचं पारायण करण्याची प्रथा रुजत गेली.

December 2025 festival list: मोक्षदा एकादशीपासून दत्त जयंतीपर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत जाणून घ्या

गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ सारामृताचं पारायण केलं जातं. दत्तसंप्रदायातील अनेक भाविक भक्तीभावाने पारायणाला बसतात. दत्तसंप्रदायातील प्रत्येक शिकवणीला अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टीकोन देखील आहेत. दत्तसंप्रदायात गुरुचरित्र पारायण मानवी जीवनासाठी किती महत्वाचं आहे हे वारंवार सांगितलं जातं.

अध्यात्मिक फायदे

गुरुचरित्र हे केवळ कथा नाही, तर गुरु-तत्त्वाचे प्रकट रूप मानले जाते. पारायणावेळी मन, वाणी आणि भावना गुरुचरणी अर्पण होत असल्याने साधकात गुरु-कृपा सहज उतरते, असे अध्यात्मात सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जेला खूप बारकाईने महत्व दिलं जातं. जर घरात सतत कलह होत असेल किंवा सतत नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास तुम्ही घरी गुरुचरित्र किंवा स्वामी सारामृताचं पारायण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते, दत्तसंप्रदायात सांगितलं जातं. गुरुचरित्र हे भक्ती, श्रद्धा, सेवा, ज्ञान आणि समाधान यांचा सुंदर संगम म्हणून ओळखला जातो.

वैज्ञानिक दृष्ट्या पारायणाचं महत्व

आजच्या ताणतणावाच्या युगात गुरुचरित्र पारायण मन, बुद्धी आणि जीवनाच्या अनेक स्तरांवर सकारात्मक परिणाम घडवतं. मनाला स्थिर आणि शांत ठेवण्यास मदत करतं. ग्रंथातील कथा, चमत्कार आणि गुरूंचे उपदेश व्यक्तीच्या अंतर्मनात श्रद्धा आणि धैर्य निर्माण करतात. पारायण करताना जपलेले नियम, संयम आणि भक्तिभाव जीवनात शिस्त किती महत्वाची आहे हे पटवून देतं. असं म्हटलं जातं की पारायणाने दया, क्षमा, परोपकार, नम्रता आणि समत्वबुद्धी असे सद्गुण माणसाच्या अंगी रुजतात.

मानसिक ताण तणाव

धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात सततचं नैराश्य पाचवीला पुजलेलं आहे. यासगळ्याला सामोरं जाणं अनेकदा कठीण होतं. त्यामुळे गुरुचरित्र पारायण या सगळ्यावर मानसिक शांतता देतं. , गुरुचरित्र पारायण मनाला शांत आणि स्थिरता देतं. पारायणाचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि मेंदूची एकाग्रता वाढते.

Vastu Tips: कोणत्याही परिस्थितीत इतरांकडून घेऊ नका या वस्तू, तुमच्या घराचे होऊ शकते नुकसान

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: दत्तसंप्रदायात पारायणाला इतकं महत्व का आहे?

    Ans: दत्तसंप्रदायात गुरु म्हणजे परमेश्वराचा अंश मानला जातो. गुरुचरित्र वाचनाने गुरु-तत्त्वाशी मनाची नाळ जुळते, गुरु-कृपा प्राप्त होते आणि जीवनात आध्यात्मिक प्रगती होते.

  • Que: पारायणाची प्रथा कधी सुरु झाली?

    Ans: पारायणाची प्रथा एका क्षणी सुरु न होता, ज्ञानदेव, महानुभाव पंथ, नाथपंथ आणि टेंबे स्वामींच्या काळापासून “गुरुचरित्र वाचणे, ऐकणे, स्मरण करणे” या साधनेतून हळूहळू विकसित झाली. पुढे शिष्यांच्या पिढ्यांमध्ये ही परंपरा दृढ झाली.

  • Que: गुरुचरित्र पारायणाचे अध्यात्मिक फायदे कोणते?

    Ans: मन शुद्ध, शांत आणि स्थिर होते भक्ती, श्रद्धा, सेवा आणि नम्रता वाढते जीवनातील अडचणींवर मानसिक धैर्य मिळते साधकाला गुरु-कृपेचा अनुभव सहज येऊ लागतो घरात पवित्रता व सकारात्मकता वाढते

Web Title: Dattaguru what is the impact of reciting gurucharitra on human life what does spirituality and science say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 06:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.