Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

December Chaturgrahi Yog: डिसेंबरमध्ये या ग्रहांचा धनु राशीमध्ये चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

डिसेंबरमध्ये धनु राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. धनु राशीत मंगळ, सूर्य, शुक्र आणि बुध यांचे अद्भुत संयोजन होत आहे त्याचा सकारात्मक प्रभाव काही राशीच्या लोकांवर पडणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 29, 2025 | 09:08 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • डिसेंबरमध्ये तयार होणार चतुर्ग्रही योग
  • या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार
  • चतुर्ग्रही योगाचा फायदा
 

डिसेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. डिसेंबरमध्ये चार ग्रहांच्या युतीमुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु राशीच्या धनु राशीत मंगळ, सूर्य, शुक्र आणि बुध यांचे एक अद्भुत संयोजन तयार होणार आहे, जे या राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. पंचांगानुसार, सर्वप्रथम मंगळ 7 डिसेंबर रोजी रात्री 8.27 वाजता धनु राशीत प्रवेश करेल, त्यानंतर सूर्य 16 डिसेंबर रोजी सकाळी 4.26 वाजता धनु राशीत प्रवेश करेल. त्यानंतर, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. त्यानंतर, 29 डिसेंबर रोजी सकाळी 7.27 वाजता बुध धनु राशीत प्रवेश करेल. 29 डिसेंबर रोजी चार प्रमुख ग्रह धनु राशीत एकत्र येतील. यामुळे नवीन वर्ष काही राशीच्या लोकांसाठी चांगले असणार आहे. डिसेंबरमध्ये चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.

डिसेंबर चतुर्ग्रही योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

डिसेंबरमध्ये होणाऱ्या चतुर्ग्रही योगाचा फायदा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. करिअरच्या प्रगतीसाठी हा योग खूप फायदेशीर मानला जातो. नोकरी करणाऱ्या लोकांच्या या योगामध्ये प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. या काळात तुम्हाला काही नवीन संधी मिळतील. व्यवसायात असलेल्यांना भागीदारीची संधी मिळू शकते. व्यवसायातील भागीदार तुमचा व्यवसाय वाढविण्यास मदत करू शकतो. शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

Zodiac Sign: हर्ष योग आणि शनि देवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होईल लाभ

कर्क रास

धनु राशीतील चार ग्रहांची युती कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. तुमच्या अडचणी कमी होतील. ज्यामुळे पैशाची गुंतवणूक केल्याने तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

सिंह रास

डिसेंबरमध्ये चार ग्रहांची युती लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. उत्पन्नाचा स्त्रोत वाढू शकतो. ज्यामुळे आर्थिक अडचणी कमी होतील. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त बचत करू शकाल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला गुंतवणुकीची चांगली संधी मिळू शकते. तुम्ही जे काही हाती घ्याल ते यशस्वी होण्याची चांगली शक्यता आहे.

धनु रास

डिसेंबरमध्ये धनु राशीत चार ग्रहांची युती होत आहे हा योग धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. नोकरी बदलण्यासाठी हा अनुकूल काळ असू शकतो, ज्यामुळे उच्च पद आणि पगार मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. या काळात तुम्हाला पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील.

Shukra Gochar: शुक्र करणार शनिच्या नक्षत्रात संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ 

कुंभ रास

धनु राशीत तयार होणाऱ्या चतुर्ग्रही योगाचा फायदा कुंभ राशीच्या लोकांना होणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील, तर व्यवसाय करणाऱ्यांना पैसे कमविण्याची संधी देखील मिळेल. शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी असलेल्यांसाठी हा चांगला काळ राहील. तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चतुर्ग्रही योग म्हणजे काय

    Ans: ज्यावेळी चार ग्रह एकाच वेळी एकाच राशीत येतात त्याला चतुर्ग्रही योग असे म्हटले जाते. हा योग शक्तिशाली आणि परिणामकारक मानला जातो

  • Que: डिसेंबरमधील चतुर्ग्रही योगात कोणत्या ग्रहाचा समावेश आहे

    Ans: डिसेंबरमधील चतुर्ग्रही योगात मंगळ, सूर्य, शुक्र आणि बुध या ग्रहाचा समावेश आहे

  • Que: धनु राशीच्या लोकांवर या योगाचा कसा परिणाम होणार आहे

    Ans: आत्मविश्वासामध्ये वाढ, आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा, अडकलेली कामे पूर्ण होणे, प्रवास करणे, करिअरमध्ये नवीन संधी

Web Title: December chaturgrahi yog 2025 yoga will be formed in sagittarius the fate of people of this zodiac sign will change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Parama Ekadashi 2026: तीन वर्षांतून एकदा येणारी परम एकादशी यंदा कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Parama Ekadashi 2026: तीन वर्षांतून एकदा येणारी परम एकादशी यंदा कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Chanakya Niti: नात्यांमध्ये फसवणूक टाळायची असेल तर ओळखा स्वार्थी लोकांची लक्षणे
2

Chanakya Niti: नात्यांमध्ये फसवणूक टाळायची असेल तर ओळखा स्वार्थी लोकांची लक्षणे

Datt Bhakti Geet: निघालो घेऊन दत्ताची पालखी या लोकप्रिय भक्तिगीताचा काय आहे इतिहास जाणून घ्या
3

Datt Bhakti Geet: निघालो घेऊन दत्ताची पालखी या लोकप्रिय भक्तिगीताचा काय आहे इतिहास जाणून घ्या

Samsaptak Yog: गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे तयार होत आहे समसप्तक योग, या राशींच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव
4

Samsaptak Yog: गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे तयार होत आहे समसप्तक योग, या राशींच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.