Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

आषाढ महिन्यातील अमावस्येला महाराष्ट्रात ‘दीप अमावस्या’ किंवा ‘दिव्यांची अवस’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. श्रावणाच्या स्वागतापूर्वी साजऱ्या होणाऱ्या या परंपरेला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात सविस्तर जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 10, 2026 | 01:25 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात
  • आषाढ अमावस्येला ‘दीप अमावस्या’ म्हणून साजरी केली जाते
  • श्रावणाच्या स्वागतापूर्वी घराची आणि देवघराची स्वच्छता केली जाते
 

 

आषाढ महिन्याच्या अमावस्येला महाराष्ट्रात ‘दीप अमावस्या’, ‘दिव्यांची अमावस्या’ किंवा ‘दिव्यांची अवस’ म्हणून साजरे केले जाते. हा दिवस श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येत असल्याने त्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या दिवशी घरातील दिवे, समया, निरांजने आणि लामणदिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे.

अमावस्येलाच दिव्यांची पूजा का?

अमावस्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेली रात्र. त्यामुळे प्राचीन काळी या रात्री अंधार अधिक जाणवत असे. अशा वेळी दिवा हा प्रकाश, ज्ञान, आशा आणि मांगल्याचे प्रतीक मानला गेला. म्हणूनच अमावस्येच्या अंधारात दीप प्रज्वलित करून ‘अंधारातून प्रकाशाकडे’ जाण्याचा आध्यात्मिक संदेश या परंपरेतून देण्यात आलेला आहे. दीप हा केवळ प्रकाश देणारी वस्तू नसून हिंदू संस्कृतीत तो अग्नी, सूर्य, ज्ञान आणि दैवी तेजाचे प्रतीक मानला जातो. म्हणून दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन करून त्यांच्या माध्यमातून जीवनातील अज्ञान, नकारात्मकता आणि अंधकार दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते.

Solar Eclipse: वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणावेळी या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत राहावे लागेल सावध

श्रावणाच्या स्वागताची तयारी

दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या प्रारंभापूर्वीची अमावस्या असल्यामुळे या दिवशी घरातील देवघर आणि पूजेचे साहित्य स्वच्छ करण्याचीही परंपरा आहे. वर्षभर वापरलेले दिवे धुवून-पुसून स्वच्छ केले जातात. त्यामध्ये तेल किंवा तूप भरून वात लावली जाते आणि पाटावर रांगोळी व फुलांची सजावट करून सर्व दिव्यांची सामूहिक पूजा केली जाते. काही घरांमध्ये गूळ आणि कणकेपासून तयार केलेले गोड दिवे नैवेद्य म्हणून तयार केले जातात. हे दिवे प्रज्वलित करून देवाला अर्पण करण्याची महाराष्ट्रातील सुंदर परंपरा आहे.

दिव्यांप्रति कृतज्ञता

आपल्या दैनंदिन जीवनात दिव्याचे मोठे महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात घरातील प्रकाशासाठी तेलाचे दिवे, समया आणि निरंजन यांचाच आधार होता. त्यामुळे वर्षभर प्रकाश देणाऱ्या या साधनांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही दीप अमावस्येकडे पाहिले जाते.

पुण्यातील म्हसोबा मंदिरातील दीपोत्सव

दीप अमावस्येनिमित्त मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव होणाऱ्या ठिकाणांमध्ये पुण्यातील मंडई येथील श्री म्हसोबा मंदिराचा उल्लेख करता येतो. या मंदिर परिसर ११०० दिव्यांची आरास करण्यात आली होती. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरात दीप अमावस्येनिमित्त गाभाऱ्यात आणि शिवपिंडीभोवती दिव्यांची आकर्षक आरास केली जाते. मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते.

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण

दीप अमावस्या म्हणजे केवळ दिवे लावण्याचा दिवस नाही; ती प्रकाशाचे महत्त्व जाणून घेण्याची, आपल्या परंपरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि श्रावणाच्या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याची मंगल सुरुवात आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करताना केवळ एक धार्मिक विधी म्हणून न पाहता ‘माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश वाढू दे, घरात सुख-शांती आणि मांगल्य नांदू दे’ अशी प्रार्थना करण्याची परंपरा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: दीप अमावस्या कधी साजरी केली जाणार आहे

    Ans: दीप अमावस्या बुधवार, 12 ऑगस्ट रोजी आहे

  • Que: दीप अमावस्येला दिव्यांची पूजा का केली जाते?

    Ans: दीप हा प्रकाश, ज्ञान, आशा आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करून अंधकार दूर होऊन जीवनात ज्ञानाचा प्रकाश वाढावा, अशी प्रार्थना केली जाते.

  • Que: दीप अमावस्येचा श्रावणाशी काय संबंध आहे?

    Ans: आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याचे आगमन होते. त्यामुळे दीप अमावस्या ही श्रावणाच्या स्वागताची आणि धार्मिक वातावरण निर्मितीची सुरुवात मानली जाते.

Web Title: Deep amavasya the importance of the tradition behind worshipping diya on ashadh amavasya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • amavasya
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.