फोटो सौजन्य- pinterest
देवशयनी एकादशीच्या दिवशी विधिवत पूजा केली जाते तसेच भक्त उपवास देखील करतात. यावेळी भगवान विष्णूंना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. असे केल्याने चातुर्मासामध्येही भगवान विष्णूंचा तुमच्यावर आशीर्वाद राहतो. यंदा देवशयनी एकादशी 6 जुलै रोजी आहे. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासाचा कालावधी 4 महिन्यांचा असतो. देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि देवउठनी एकादशीला संपते. असे म्हटले जाते की, भगवान विष्णू निद्रावस्थेत असताना काही वस्तू अर्पण केल्यास भक्तांच्या कामामध्ये येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. देवशयनी एकादशीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, जाणून घेऊया
भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. त्यांना नैवेद्य दाखवताना तुळशीचा वापर केला जातो. ते निद्रावस्थेत जाताना तुळशीची पाने किंवा तुळशीची माळ अर्पण करणे शुभ मानले जाते. तुळशीमुळे वातावरण शुद्ध राहते. असे म्हटले जाते की, रात्रीच्या वेळी तुळशीतून निघणारी ऊर्जा दोष, दोषी विचार आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यास मदत करते. जर रोज तुळशीची पूजा केल्याने मुले, संपत्ती आणि कुटुंबावर देखील त्यांचा कायम आशीर्वाद राहतो.
देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगांचे रेशमी कापड अर्पण करावे. पिवळ्या रंगांच्या कापडाचा वापर करणे खूप शुभ मानले जाते. पिवळा रंग हा शांती, पवित्रता आणि सद्गुणांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, पिवळ्या रंगांचे वस्त्र अर्पण केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये सुख समृद्धी लाभते. तसेच कुटुंबातील वातावरण आनंदी राहते.
विष्णूंना लक्ष्मीपती असे देखील म्हटले जाते. यावेळी एकादशीच्या दिवशी पिवळ्या कपड्यामध्ये चांदी किंवा पितळेचे नाणे गुंडाळून भगवान विष्णूंना अर्पण करावे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये संपत्ती आणि आर्थिक स्थिरता टिकून राहते. हे नाणे वर्षभर देव्हाऱ्यात ठेवल्यास आपल्या कुटुंबावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
शंख किंवा सुदर्शन चक्र याला धार्मिक शास्त्रात खूप महत्त्व आहे. जर आपण घरामध्ये सुदर्शन चक्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच शत्रूंच्या अडथळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो.
भगवान विष्णूंना सुंगधित फुले खूप प्रिय आहेत. गुलाब, चंपा, चमेली, मोगरा ही फुले त्यांना अर्पण करावीत. यामुळे घरामध्ये मानसिक शांती आणि प्रेमाची भावना बळकट होते. यामुळे भक्ताला भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)