फोटो सौजन्य- pinterest
देवशयनी एकादशी यंदा रविवार, 6 जुलै रोजी आहे. या एकादशीला आषाढी एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवशी प्रभावशाली योग म्हणजे गुरु आदित्य योग तयार होत आहे. देवशयनी एकादशीला शुभ योग, साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योग या शुभ योगांचे संयोजन होणार आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी नारायणाच्या आशीर्वादाने ग्रहांच्या शुभ संयोगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो तर काहींना व्यवसायामध्ये लाभ होऊ शकतो. कोणत्या भाग्यशाली राशी आहेत त्या जाणून घ्या
ग्रहांच्या शुभ संयोगामुळे या राशीच्या लोकांना मानसिक आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवले असाल तर त्याचा फायदा होईल. कोणाला पैसे उधार दिले असतील तर परत मिळतील. जर एखाद्या व्यक्तीला मालमत्ता खरेदी करायची असल्यास हा दिवस चांगला आहे. तुम्ही घरामध्ये फर्निचर, वाहन किंवा दागिने यासारख्या नवीन वस्तू जोडण्याची शक्यता आहे.
यावेळी कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आर्थिक सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होऊ शकते. व्यवसायामध्ये असलेल्यासाठी हा काळ चांगला आहे. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. यामुळे घरामध्ये उत्साहाचे वातावरण राहील.
देवशयनी एकादशीला विठ्ठलाच्या कृपेने आर्थिक, कौटुंबिक गोष्टींसाठी फायदेशीर राहील. मालमत्ते संबंधित कोणताही जुना वाद असल्यास तो मिटू शकतो. जमीन, वाहन किंवा भूखंड खरेदी करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिक स्थिरता राहील. नातेसंबंधात गोडवा राहील. शेयर बाजारात केलेली गुंतवणूक किंवा दीर्घकालीन योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
देवशयनी एकादशीला धनु राशीच्या लोकांना आध्यात्मिक जागृती होईल. या लोकांना आर्थिक वाढीच्या संधी उपलब्ध होतील. तुम्ही परदेशात जाऊ शकतात. व्यापारात असलेल्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर आहे. करिअरची सुरुवात करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक प्रवासामुळे आनंद आणि संपत्ती दोन्ही मिळू शकते.
मीन राशीच्या लोकांच्या जीवनात या दिवशी कर्जमुक्ती आणि आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता आहे. मानसिक चिंता असल्यास ती कमी होईल. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहे त्यांना फायदा होईल. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)