फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार, 3 जुलै रोजी मासिक दुर्गाष्टमी आहे. या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. या दिवशी देवीची पूजा करुन तिचे आवडचे फूल आणि नैवेद्य अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे.
आज मासिक दुर्गाष्टमीचे व्रत पाळले जात आहे. हा दिवस देवी दुर्गेला समर्पित आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमीचे व्रत पाळले जाते. हा दिवस देवींच्या भक्तासाठी विशेष मानला जातो. कारण या देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्ताच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धीचे वातावरण राहते, अशी मान्यता आहे. देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा, जाणून घ्या.
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन झाल्यानंतर लाल रंगांचे कपडे परिधान करावे. त्यानंतर देव्हारा गंगाजलाने स्वच्छ करुन घ्यावा. चौरंगावर लाल वस्त्र पसरवून त्यावर देवीच्या मूर्तीची स्थापना करावी. तसेच देवीला लाल चुनरी, सिंदूर, अक्षत, रोली, कुंकू, धूप आणि दिवा अर्पण करावा. पूजेकरतेवेळी देवीच्या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर दुर्गा चालिसाचे पठण करावे. सर्व झाल्यानंतर देवीची आरती करावी आणि नैवेद्य दाखवून पूजेची सांगता करावी.
देवीचाय् पूजेवेळी अनेक प्रकराचे नैवेद्य अर्पण केले जातात. परंतु देवीच्या काही प्रिय वस्तू तिला नैवेद्य म्हणून अर्पण कराव्यात. जसे की मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी हलवा, पुरी, चणे, नारळ, फळे आणि मिठाई यांसारख्या गोष्टी अर्पण करु शकता. तसेच खीर, मालपुआ आणि सुकामेवा यांसारख्या गोष्टी देखील अर्पण करु शकता. देवीच्या नैवेद्य सात्विक असावा त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करु नये.
देवी दुर्गेला लाल रंगांचे फूल खूप आवडते. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी लाल हिबिस्कस, लाल गुलाब, लाल ऑलिंडर किंवा लाल कमळाची फुले या गोष्टी अर्पण करु शकता. त्याचबरोबर झेंडू आणि चमेलीची फुले देखील अर्पण करु शकता.
हिंदू धर्मामध्ये मासिक दुर्गाष्टमीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्याने देवी भक्तांवर प्रसन्न होते आणि त्या साधकावर देवीचे विशेष आशीर्वाद राहतात. त्याचसोबतच घरात सुख समृद्धी राहते. देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हे व्रत केले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)