फोटो सौजन्य- pinterest
आज, सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. राशीनुसार करा हे उपाय
हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. ती व्यक्तींना धन, समृद्धी, संपत्ती प्रदान करते. दिवाळी ही देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. दिवाळीच्या दिवशी काही मंत्रांचा जप केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते असे मानले जाते. असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर व्यक्तीला कधीही आर्थिक अडचणी येत नाहीत.
आज, 20 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची श्रद्धापूर्वक पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात आनंद आणि समृद्धी येते. तसेच 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे या दिवशी राशीनुसार मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरणार आहे. राशीनुसार दिवाळीत देवी लक्ष्मीच्या कोणत्या मंत्रांचा जप करावा, जाणून घ्या
यंदा कार्तिक अमावस्या दोन दिवसांची आहे. कार्तिक अमावस्येची सुरुवात दुपारी 3.44 वाजता होणार आहे आणि 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5.54 वाजता संपेल. मात्र यावेळी लक्ष्मीपूजनाची पूजा 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी केली जाणार आहे.
दिवाळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार वेगवेगळ्या लक्ष्मी मंत्रांचा जप करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार मंत्राचा जप केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.
ॐ ऐं क्लीं सौं:
ॐ ऐं क्लीं श्रीं:
ॐ क्लीं ऐं सौं:
ॐ ऐं क्लीं श्रीं:
ॐ ह्रीं श्रीं सौं:
ॐ श्रीं ऐं सौं:
ॐ हीं क्लीं श्रीं:
ॐ ऐं क्लीं सौं:
ॐ हीं क्लीं सौं:
ॐ ऐं क्लीं ह्रीं श्रीं सौं:
ॐ हीं ऐं क्लीं श्रीं:
ॐ हीं क्लीं सौं:
ॐ महालक्ष्मै च विद्महे विष्णुपतन्यै च धीमहि|
तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात
लक्ष्मी पूजनाला पूजा झाल्यानंतर राशीनुसार उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते. तसेच मंत्रांचा जप देखील केला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)