फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिना शुक्रवार, 25 जुलैपासून सुरु होणार आहे. भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते. व्यक्ती जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते. आध्यात्मिक उर्जेने आणि शुभ संकेतांनीही परिपूर्ण असतो. स्वप्नशास्त्रानुसार श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ही स्वप्ने शुभ किंवा अशुभ सांगण्यात आलेली आहे. श्रावण महिन्यात स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ आहे, जाणून घ्या
स्वप्नशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात दिसणारी स्वप्ने सामान्य दिवसांपेक्षा जास्त प्रभावी असतात. असे मानले जाते की, हा महिना भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आहे. या महिन्यात दिसणारी काही स्वप्ने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. जर व्यक्तीला स्वप्नामध्ये नंदी बैल किंवा बैल दिसण्याचा अर्थ असा होतो की, यावेळी तुमची सरकारी कामे प्रलंबित पूर्ण होतील.
श्रावण महिन्यात तुम्हाला साप चावताना दिसण्याचा अर्थ म्हणजे आर्थिक लाभ, संतती सुख आणि नोकरीत बढतीचे लक्षण असू शकते. तसेच स्वप्नात नाग दिसण्याचा संबंध मालमत्तेशी संबंधित आहे. यामुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
श्रावण महिन्यात स्वप्नामध्ये रुद्राक्ष दिसणे खूप शुभ मानले जाते. शिवलिंगाला रुद्राक्षाची माळ अर्पण करणे किंवा स्वप्नात माळ परिधान करणे हे शुभ मानले जाते. ही स्वप्न दिसणे म्हणजे तुमच्यावर भगवान शिवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. स्वप्नात रुद्राक्ष पाहणे हे मान आणि संपत्तीत वाढ दर्शविते.
श्रावण महिन्यामध्ये नदीत स्नान करताना दिसणे खूप शुभ मानले जाते. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद येईल. तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून मुक्ती देखील मिळेल. स्वप्न जीवनात नवीन सुरुवात होण्याचे संकेत देते.
श्रावण महिन्यात शिवलिंग दिसणे शुभ संकेत पाहणे. भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला होणारे त्रास दूर होतील आणि आध्यात्मिक भौतिक प्रगती होईल. स्वप्नामध्ये आरती होताना दिसणे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला घरगुती अडचणींपासून मुक्तता मिळणार आहे.
श्रावण महिन्यात स्वप्नात शिवलिंगाजवळ साप खूप शुभ मानले जाते. शिवलिंगाजवळ साप दिसण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि पैशाशी संबंधित तुमचे सर्व अडकलेले काम पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)