फोटो सौजन्य- pinterest
काहीवेळा आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा आपल्याला त्याच्या भुवया एकमेंकाना जुळलेले दिसण्यावरुन तुमचा स्वभाव समजतो. चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांचा आकार, कपाळावरील रेषा, ओठ, नाक आणि भुवया हे व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. शास्त्रामध्ये व्यक्तीचा स्वभाव पाहून नशीब जाणता येते असे म्हटले आहे. चेहऱ्यावरील आणि शरीराच्या प्रत्येक भागावरील चिन्हांचा काहीना काही अर्थ असतो. त्याद्वारे व्यक्तीचे विचार, वर्तन आणि भविष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेता येतात. भुवया एकमेंकाना जुळणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
सामुद्रिकशास्त्रानुसार, भुवयांचा आकार, त्यांची जाडी, अंतर आणि पोत हे व्यक्तीच्या स्वभाव आणि विचारांना प्रतिबिंबित करते. भुवयांमध्ये थोडे अंतर असणे चांगले मानले जाते. पण दोन्ही भुवया एकत्र जोडले जातात त्यांच्यात काहीच अंतर राहत नाही याला वेगवेगळे संकेत प्राप्त होतात.
ज्या लोकांच्या भुवया एकमेंकाना जुळलेल्या असतात ते लोक खूप विचार करणारे, सर्जनशील, एखाद्याच्या मनात गोष्टी लपवून ठेवणारे असतात. कोणतीही परिस्थिती समजून घेऊन त्यावर विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. हे लोक भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी त्यांच्या मनाचा विचार करतात.
काही लोकांना त्यांच्या आतील भावना सहजपणे मांडता येत नाही. ते मनात कोणते विचार करत आहे ते जाणून घेणे कठीण असते. सामुद्रिकशास्त्रानुसार, असे लोक आपली गुपिते आपल्या मनातच ठेवतात कोणाशीही काही शेअर करत नाही. काही गोष्टींपासून ते अलिप्त राहणे पसंत करतात.
दोन्ही भुवया एकमेंकाना जोडलेल्या व्यक्ती असणे म्हणजे त्या व्यक्ती स्वभावाने तापट असणे होय. या व्यक्तींना लवकर राग येऊ शकतो कधी कधी हे लोक छोट्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देतात. त्यांचा मूड खराब असल्यास त्यांना शांत करणे कठीण असते. अशा व्यक्तींचा राग लवकर शांत होतो.
अशा व्यक्ती एकादा निर्णय घेण्यास सक्षम असतात. हे सर्व गोष्टींचा विचार करुन, समजून घेऊन आणि संपूर्ण योजना व्यवस्थितरित्या आखून आपली पावले उचलतात. इतर कोणतीही व्यक्ती त्यांना घाईने निर्णय घेण्यास भाग पाडू शकते.
सामुद्रिकशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या भुवया एकमेंकाना जुळलेल्या असतात. अशा व्यक्तींना कधीही लग्नामध्ये अडथळे येत नाही, असे मानले जाते. हे लोक आपले विचार उघडपणे सर्वांसमोर मनमोकळेपणाने सर्वांसमोर मांडतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)