फोटो सौजन्य- pinterest
गुरु ग्रह मृगशिरा नक्षत्रात सध्या स्थिर आहे. पण उद्या म्हणजेच शनिवार, 14 जून रोजी तो आपले नक्षत्र बदलणार आहे. गुरु ग्रह मृगशिरा नक्षत्र सोडून राहूच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरु ग्रहाच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर सकारात्मक होईल तर काहींच्या जीवनात चढ उतार येतील. दरम्यान, अनेक राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनामधील समस्या ते करिअरपर्यंत शुभ परिणाम मिळतील तर काहींना अडीअडचणींचा सामना करावा लागेल. कोणत्या राशीच्या लोकांना गुरु ग्रहाच्या नक्षत्र बदलांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, जाणून घ्या
गुरु ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांचे जीवन मानसिकदृष्ट्या मजबूत राहील. या लोकांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जाईल. तसेच परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
सिंह राशीच्या लोकांना गुरु ग्रहाच्या बदलाचा परिणाम म्हणजे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. या लोकांचे कुठेही अडकलेले पैसे किंवा कोणी उधारी घेतली असल्यास ते परत मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमचा सहकाऱ्यांसोबत चांगला समन्वय असेल. तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील. तुम्ही कुठेही दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक केली असल्यास ती पूर्ण होईल.
धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्यामुळे त्याचा या नक्षत्र बदलाचा परिणाम धनु राशीच्या लोकांवर शुभ होणार आहे. या लोकांना सुख समृद्धीबरोबरच धनप्राप्ती देखील होण्याची शक्यता आहे. या लोकांचे समाजामध्ये नाव होईल. तुमची एखाद्या अनोखी व्यक्तीची ओळख होऊ शकते त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. कोणतेही काम सुरु करताना वडिलांचा किंवा जवळच्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे नक्षत्र बदल शुभ राहणार आहे. तुमचे कोणतेही गुपित कोणाशीही शेअर करु नका. करिअर क्षेत्रामध्ये मकर राशीच्या लोकांना चढ उतार जाणवू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
गुरु नक्षत्राच्या या बदलामुळे तुमच्या व्यक्तिमहत्त्वामध्ये मोठे बदल घडून येऊ शकतात. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करु शकता. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत उच्च स्थान मिळविण्यासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबामध्ये जर मतभेद असतील तर ते दूर होतील. पूर्वापैक्षा आज तुमचे आरोग्य चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)