फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की आपले मुलं मोठे होऊन एक चांगली व्यक्ती बनेल, पुढील जीवनात प्रगती करावी, समाजात नाव कमावून आपले नाव मोठे करावे इत्यादी. जर मुलाला योग्य मार्ग दाखवला नाही तर ते भरकटू शकतात. लहानपणापासूनच मुलांना चांगल्या वाईट गोष्टी शिकविणे म्हणजे खरे संगोपन करणे होय. चाणक्यांनी त्यांच्या धोरणामध्ये कुटुंब, शिक्षण आणि मुलांच्या संगोपनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजकालच्या बदलत्या जीवनशैली, डिजिटल युग अशा अनेक गोष्टींचा प्रभाव मुलांवर पडलेला दिसून येतो. मुलांना कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत काय सांगते चाणक्य नीती, जाणून घ्या
चाणक्यांच्या मते, व्यक्तीची खरी ओळख त्याच्या व्यक्तिमहत्त्वातील सत्यता आणि प्रामाणिकतेवरुन होते. जर एखादे मूल खोटे बोलायला शिकल्यास विश्वासार्ह राहणार नाही. कोणत्याही प्रकारची परिस्थिती असल्यास सत्य आणि महत्त्वाचे बोलणे गरजेचे आहे. यामुळे पालकांनी मुलांना सुरुवातीपासून यांचे धडे दिले पाहिजे.
जीवनामध्ये आपल्याला कधी ना कधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीने आव्हानांना घाबरुन न जाता त्याला तोंड द्या. त्याचप्रमाणे पडणे वाईट नाही तर पडल्यानंतर उठून मात करणे गरजेचे आहे म्हणजे एखादी समस्या आलीच तर त्यावर नक्कीच काहींना काही उपाय असतात.
लहान वयातच मुलांना स्वतःची कामे स्वतः करायला शिकवा. उदाहरणार्थ शाळेत जाताना स्वतःची बॅग भरणे, स्वतःचे अंथरुण घालणे, खेळून झाल्यानंतर खेळणी आवरुन ठेवणे अशा गोष्टी केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते इतरांवर कधीही अवलंबून राहावे लागणार नाही. चाणक्याच्या मते, जर व्यक्ती स्वावलंबी असल्यास ती व्यक्ती कधीही कमकुवत नसते.
शिक्षणाच्या बरोबरीने चांगले संस्कार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, मुलांमध्ये नम्रता, आदर आणि सहिष्णुता यांसारख्या गुणांची समज मुलांमध्ये असली पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान असेल पण योग्य ती मूल्ये नसल्यास ते समाजासाठी धोका ठरु शकतो.
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, वाईट सवयींचा आपल्या मुलांच्या जीवनावर खोलवर परिणाम होताना दिसतो. जर तुमचे मूल चुकीच्या मित्रांसोबत राहिल्यास वाईट विचार आणि सवयी त्यांना लागू शकतात. चांगले मित्र बनवायला शिकवा वाईट संगत टाळा.
चाणक्यांच्या मतांनुसार, जे लोक वेळेला महत्त्व देतात तेच जीवनात पुढे जातात. मलांनी खेळणे महत्त्वाचे आहेत तितकेच अभ्यास, विश्रांती आणि घरातील कामेही करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लहानपणापासूनच त्यांना सर्व कामे करण्यासाठी वेळ वाटून द्या त्यामुळे मुलांना वेळेचे महत्त्व समजेल.
कोणत्याही समस्येवर रागवणे हा उपाय नाही. तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे यातच खरा विजय असतो. जर एखादा मुलगा चिडलेला असल्यास त्याला प्रेमाने समजावून सांगा.
चाणक्यांच्या मते, प्रत्येकाने असे जीवन जगले पाहिजे की, ज्यामुळे त्याचा इतरांनाही फायदा होईल. लहानपणापासून मुलांमध्ये द्याळूपणा, सहकार्य आणि मदतीची भावना निर्माण करा. मोठ्यांचा आदर करायला शिकवा यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्यांबद्दल मनात आदर निर्माण होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)