फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत आणि समृद्ध होण्याची इच्छा असते. बऱ्याचदा व्यक्तीच्या जीवनामध्ये संपत्ती, समृद्धी आणि सुखसोयी येतात. स्वप्नशास्त्रात उल्लेख केल्यानुसार येणारी स्वप्ने योग्य वेळी ओळखल्यास ते चांगल्या काळाचे आणि आर्थिक समृद्धीचे लक्षण मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळणार असेल तर त्या व्यक्तीला दिसणारी स्वप्ने ही शुभ असू शकतात. वारंवार येत असलेल्या समस्यांमुळे लोक स्वप्नात दिसणाऱ्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात मात्र अशी स्वप्ने कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ परिणाम देणारी असू शकतात.
स्वप्नशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये मंदिर, सूर्यदेव, चंद्र किंवा ध्वज दिसत असल्यास ते भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसांसाठी चांगले मानले जाते. अशी स्वप्ने एखाद्या व्यक्तीला सुखसोयींचा लाभ आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार असल्याचे दर्शवते.
तुम्ही स्वप्नात स्वतःला एखादे झाड किंवा रोप लावताना पाहिले तर ते लवकरच तुम्हाला उच्च स्थान मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षण असू शकते. तसेच नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि तुमची प्रगती होईल. त्यासोबतच हे देखील सूचित करते की, येणारा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला सोन्याच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये खीर खाताना पाहणे म्हणजे धन आणि समृद्धीच्या प्राप्तीचे लक्षण मानले जाते. एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दारू पिताना दिसले तर ते आर्थिक लाभ आणि समृद्धीचे देखील संकेत देते. वास्तविक दारु पिणे अशुभ मानले जाते.
जर स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःला अनेक डोके आणि हात असलेले पाहणे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. म्हणजेच करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवन देखील सुधारण्यास मदत होणार आहे.
स्वप्नात तारे, सूर्य, चंद्र किंवा पर्वत दिसणे देखील खूप शुभ आहे. याचा संबंध संपत्ती आणि पैशाशी येतो. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला धैर्याने नदी ओलांडताना पाहिले तर ते जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ आणि प्रगती दर्शवते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)