फोटो सौजन्य- pinterest
शनिवार, 30 ऑगस्टचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तर काहींचा चढ उताराचा राहील. चंद्राचे संक्रमण तूळ आणि वृश्चिक राशीमध्ये राहील. बुध ग्रह सिंह राशीत संक्रमण करणार आहे. तसेच बुध आणि सूर्याची युती सिंह राशीमध्ये राहील. या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल. चंद्र, सूर्य आणि बुध यांच्यामध्ये केंद्र योग तयार होतील. त्याचप्रमाणे विशाखा नक्षत्राच्या संयोगाने इंद्र आणि त्रिपुष्कर योग तयार होईल. शनिदेवाचा आशीर्वाद आणि त्रिपुष्कर योगामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तसेच या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो त्याबरोबरच मोठे यश देखील मिळू शकते. कोणत्या राशीच्या लोकांना शनिवारी फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही प्रवास करु शकता त्याचा तुम्हाला अपेक्षित फायदा मिळेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नफ्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. तुमची अडकलेली कामे वेळेमध्ये पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे काम वेळेवर पूर्ण होतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यावरील सामाजिक प्रभाव वाढेल. आजारी असलेल्यांचे आरोग्य सुधारेल. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये उत्पन्नात वाढ होईल. मुलाखतीत तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलांकडून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही पैसे कमवून स्वतःसाठी काही खरेदी करू शकाल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम सुरळीत पार पडेल. तसेच तुम्हाला सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबासह तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. अडकलेले कोणतेही काम एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण करु शकता. नशिबाची साथ लाभेल. कोणतेही नवीन काम सुरू करत असाल तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी राहू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)