Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dussehra 2025: दसऱ्याला शमीच्या पानांची पूजा करणे का आहे खास, यामागील कारणे जाणून घ्या

दसरा हा केवळ रावण जाळण्यासाठी नाही तर विजय आणि सौभाग्याची गुरुकिल्ली असलेल्या शमीच्या पानांची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे. काय आहे शमीच्या पानांचे महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 27, 2025 | 01:43 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

दसरा किंवा विजयादशमी हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले. दरम्यान हा दिवस फक्त रावण जाळण्यापुरता मर्यादित नसून या दिवशी आजून एक परंपरा जपली जाते. कोणती ती तुम्हाला माहिती आहे का? ती परंपरा म्हणजे शमीच्या पानांची पूजा करणे. शमीच्या पानांची पूजा करणे हे धर्म, पौराणिक कथा आणि ज्योतिष या तिन्ही पैलूंमध्ये अत्यंत शक्तिशाली आणि फायदेशीर मानले जाते.

महाभारतातील पांडव आणि शमीच्या पानांची काय आहे संबंध

शमीच्या पानांना महाभारत काळापासून खूप महत्त्व आहे. ज्यावेळी पांडव वनवासात गेले त्यावेळी त्यांनी त्यांची सर्व शस्त्रे शमीच्या पानाच्या झाडात लपवून ठेवली होती. 12 वर्षांनी ते परत परतले त्यावेळी त्यांना ती शस्त्रे शाबूत असल्याचे आढळले. म्हणून शमीच्या पानांला शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानांची आणि शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आहे.

Shardiya Navratri: नवरात्रीच्या पंचमी तिथीच्या दिवशी करा स्कंदमातेची पूजा, जाणून घ्या शुभ मुहू्र्त, मंत्र आणि नैवेद्य

शमीच्या पानाला सोने का म्हणतात

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानाची देवाणघेवाण करण्याची परंपरा आहे. राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ही प्रथा प्रचलित आहे. ही परंपरा सोने वाटून घेण्याची म्हणून ओळखली जाते. शमीची पाने सोन्याइतकीच शुभ मानली जातात. ही रोपे घरात ठेवल्याने लक्ष्मी येते. त्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते, असे मानले जाते.

शमीची पाने आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार, शमी वृक्ष हा शनि ग्रहाचा प्रिय आहे. दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केल्याने शनिचे नकारात्मक प्रभाव शांत होतात आणि करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होण्यास मदत होते. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती नियमितपणे शमी वृक्षाची पूजा करतो, त्याच्या जीवनात स्थिरता येते आणि तो त्याच्या शत्रूंवर विजय मिळवतो.

Navratri 2025: नवरात्रीमध्ये जास्वंदाच्या फुलांचे करा ‘हे’ उपाय, संपत्ती आणि समृद्धीची कधीही भासणार नाही कमतरता

शमी वृक्षाची पूजा करण्याचे फायदे

शत्रूंच्या अडथळ्यांपासून आणि त्रासांपासून मुक्तता

शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावाचे निर्मूलन

घरात आनंद, शांती आणि सौभाग्य वाढेल

धन आणि समृद्धीची प्राप्ती

काम आणि व्यवसायात यश मिळेल.

प्रत्येक क्षेत्रात विजय आणि न्याय

रावण आणि शमीचा संबंध

असे म्हटले जाते की, लंकेत रावण शमी वृक्षाची पूजा एका खास पद्धतीने करत असे. म्हणूनच ते युद्ध आणि विजयाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. आजही दक्षिण भारतात दसऱ्याच्या दिवशी लोक शमीच्या झाडाखाली पूजा करतात, त्याला नमन करतात आणि युद्ध किंवा कामाच्या यशासाठी आशीर्वाद घेतात.

दसऱ्याच्या दिवशी केवळ वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण नसून हा सण शक्ती आणि समृद्धीला आमंत्रित करण्याचा एक प्रसंग देखील आहे. या दिवशी शमीची पूजा केल्यानंतर शत्रूंवर विजय मिळविता येतो. तसेच शनिदोषाचा नाश होतो आणि संपत्तीची प्राप्ती होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dussehra 2025 why do people worship shami leaves on dussehra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • dharm
  • Dussehra
  • religions

संबंधित बातम्या

Ashwin Purnima 2025: अश्विन पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मंत्र
1

Ashwin Purnima 2025: अश्विन पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मंत्र

Kaam Trikon Yog: राहू, मंगळ आणि गुरु यांच्या संयोगामुळे बदलेल या राशीच्या लोकांचे नशीब
2

Kaam Trikon Yog: राहू, मंगळ आणि गुरु यांच्या संयोगामुळे बदलेल या राशीच्या लोकांचे नशीब

Zodiac Sign: स्कंदमातेच्या आशीर्वादाने तूळ राशीसह या राशीच्या लोकांना उत्पन्नात होईल अपेक्षित लाभ
3

Zodiac Sign: स्कंदमातेच्या आशीर्वादाने तूळ राशीसह या राशीच्या लोकांना उत्पन्नात होईल अपेक्षित लाभ

Numerology: पंचमी तिथीचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
4

Numerology: पंचमी तिथीचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.