
फोटो सौजन्य- pinterest
डिसेंबर महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास मानला जातो. कारण या महिन्यात एक-दोन नव्हे तर तीन एकादशी तिथी येत आहे. हिंदू धर्मात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे आणि ही तिथी सर्व दुःखे दूर करते असे म्हटले जाते. एकादशी ही प्रत्येक पंधरवड्यातली अकरावी तिथी असते, ज्यामध्ये भगवान विष्णूची पूजा उपवास करून विधीपूर्वक केली जाते. ही तिथी देवतांच्या उर्जेचे केंद्र मानली जातात आणि मानवाच्या शरीरावर, मनावर आणि चेतनेवर तिचा सर्वोत्तम परिणाम होतो. पुराणांमध्ये या एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि वैकुंठ धाम देखील प्राप्त करतात असे म्हटले जाते. डिसेंबर महिन्यात येणाऱ्या तीन एकादशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या
एकादशीचे व्रत केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन वैकुंठ धामची प्राप्ती होते. या व्रतामुळे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबालाही पुण्यफळ मिळते आणि ग्रह-नक्षत्रांचे अशुभ प्रभाव कमी होतात. एकादशीच्या रात्री झोपू नये; संपूर्ण रात्र भगवान विष्णूच्या पूजेसाठी समर्पित करावी. एकादशीचे उपवास केल्याने दारिद्र्य, दुर्दैव आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख, संपत्ती आणि समृद्धी मिळते. शिवाय, एकादशीचे उपवास केल्याने जीवनात शुभफळ प्राप्त होतात.
मोक्षदा एकादशी हा पापांपासून मुक्ती आणि मोक्षप्राप्तीचा दिवस आहे. डिसेंबरची पहिली एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी. ही एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला येते. या तिथीची सुरुवात 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.1 वाजता झाली. उद्यतिथीनुसार हे व्रत 1 डिसेंबर रोजी पाळले गेले.
सफला एकादशी ही प्रत्येक कामात यश मिळवून देणारी तिथी आहे. डिसेंबरची दुसरी एकादशी सफला एकादशी असणार आहे. जी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला येते. या तिथीची सुरुवात रविवार 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.49 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 15 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजून 19 मिनिटांनी होणार आहे. उद्यतिथीनुसार हे व्रत सोमवार, 15 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे.
मुले होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी पुत्रदा एकादशी शुभ तिथी मानली जाते. डिसेंबरमधील तिसरी एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी, जी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. या एकादशी तिथीची सुरुवात 30 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 31 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार हे व्रत बुधवार, 31 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 3 एकादशी येणार आहेत
Ans: साधारणपणे एका महिन्यात 2 एकादशी येतात. पण चांद्रमासानुसार काही वर्षांत अधिक तिथी किंवा खंड मासामुळे 3 एकादशीचा संयोग होतो. हा योग शतकात क्वचितच तयार होतो
Ans: डिसेंबरमध्ये मोक्षदा एकादशी, सफला एकादशी आणि पुत्रदा एकादशी