
मृत्यू म्हणजे मनुष्य जन्माला मिळणारा मोक्ष असा काहीसा अर्थ हिंदू धर्मातील पुराणात सांगितला जातो. तसं पहायला गेलं तर पाश्चात देशात इच्छामरणाला मान्यता दिली गेली आहे. मात्र भारतात इच्छामरणाला कायद्याने गुन्हा मानलं गेलं आहे. असं असलं तरी, असा या एका धर्मात मृत्यू मिळावा म्हणून चक्क उपवास केला जातो. कोणता आहे हा धर्म जाणून घेऊयात.
संतांनी त्य़ांच्या अभंगांतून जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याबाबतचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे. संतांच्या म्हणण्यानुसार जन्म आणि मृत्यू हे दोन्ही मनुष्य जन्माला पूर्णत्त्व प्राप्त करतात. मृत्यू म्हटलं अनेकदा वेदना विरह त्रास हेच पाहिलं जातं. मात्र मृत्यू म्हणजे मोक्ष आणि मोक्ष सर्व मोह मायेतून सुटलेला मनुष्य़ असं म्हटलं जातं. एक ठराविक काळानंतर मृत्यू प्राप्त व्हावा यासाठी जैन धर्मात उपवास केला जातो. नेमकी काय आहे ही प्रथा यबाबत हा सविस्तर लेख.
जैन धर्मात संथारा नावाची एक अनोखी परंपरा आहे. ही प्रथा माणसाला मृत्यू प्राप्त करुन देतो. सांथारा म्हणजे मृत्यू मिळवण्यासाठीचं व्रत असं म्हटलं जातं. हे व्रत करणारी व्यक्ती अन्न पाण्याचा त्याग करते. जैन धर्मात भूतदयेला मोठं महत्त्व आहे. हा धर्म अहिंसेचा मार्ग शिकवते. जैन धर्मात संथारा परंपरेला पवित्र मानलं जातं. याचं कारण म्हणजे मृत्यू वाईट नसतो तर तो सगळ्या भावभवानेतून मनुष्याला मुक्त करतो अशा अर्थाने या संथारा परंपरेकडे पाहिलं जातं.
या अनोख्य़ा प्रथेबाबत न्यायालयाने कायमच विरोध दर्शविला आहे. भारतात इच्छामरणाला कायद्याने गुन्हा म्हटलं जातं. त्यानुसार संथारा या परंपरेला किती धार्मिक दृष्टीकोनातून पाहत समाधी, मोक्ष, इच्छामरण असे विविध शब्द वापरले तरी ती आत्महत्या समजली जाते, त्य़ानुसार स्वत:ची हत्या करणं ही देखील हिंसाच आहे, त्यामुळे कित्येक वर्ष या परंपरेच्य़ा विरोधात न्यायालात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जे वयोवद्ध किंवा असाध्य आजाराने ग्रासलेले आहेत अशाच व्यक्ती संथाराचा मार्ग अवलंबतात. संथाराचा व्रत करण्यात सर्वात जास्त महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
अन्न पाण्याचा त्याग करुन मृत्यू येईपर्यंतच्या काळात व्यक्ती काहीही खात नाही किंवा पाण्य़ाचा थेंबही घेत नाही. असं म्हणतात की या काळात व्यक्तीला मृत्यू प्राप्त होण्यासाठी असंख्य वेदना होतात. असंख्य वेदना सहन करत मिळालेला मोक्ष हा पवित्र आहे अशी या धर्माची मान्यता आहे.