Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना करु नका या चुका, जाणून घ्या वास्तूचे नियम

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भक्त गणपती बाप्पाच्या मूर्तीची घरी स्थापना करतात. मूर्ती खरेदी करताना वास्तूचे कोणते नियम पाळावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 21, 2025 | 09:48 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

गणेश चतुर्थीच्या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी सार्वजनिक मित्रमंडळ मोठे मंडप उभारतात. असे मानले जाते की, यावेळी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. म्हणून गणेश चतुर्थीला भक्त गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्याची स्थापना करतात. मात्र मूर्तीची खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केल्याने शुभ परिणाम मिळतात. त्यासोबत जीवनात नेहमी सुख समृद्धी राहते.

बाप्पाची मूर्ती घरी आणताना या गोष्टींकडे द्या लक्ष

गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी घरामध्ये मूर्ती आणताना ती खूप लहान किंवा मोठी नसावी. म्हणजेच बाप्पाची मध्यम मूर्ती आणणे खूप शुभ मानले जाते. मंडळामध्ये मोठ्या आकाराच्या मूर्तीची स्थापना केली जाऊ शकते.

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

गणपतीच्या सोंडेची दिशा बघून घ्या

वास्तुशास्त्रानुसार, गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना त्याच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. घरामध्ये मूर्तीची स्थापना करण्यासाठी डाव्या सोडांची मूर्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरासाठी मूर्ती खरेदी करताना ती अशी करा की तिची सोंड डाव्या बाजूला वाकलेली असेल. कारण ही दिशा यश आणि समृद्धीची असल्याचे मानले जाते. तर उजव्या दिशेला सोंड असलेली गणेशाची मूर्ती म्हणजे पूजा करण्यासाठी कठोर नियम असणे, असे मानले जाते. शक्यतो अशा प्रकारची मूर्ती मंदिरामध्ये ठेवली जाते.

आसनाकडे द्या विशेष लक्ष

यावेळी आपल्याला गणपती बाप्पाच्या अनेक मूर्ती बघायला मिळतात. ज्यामध्ये गणपती उभे, नाचताना किंवा विश्रांतीच्या स्थितीत दिसतात. मात्र घरी आणताना ते बसलेल्या स्थितीत असणारी मूर्ती आणणे शुभ मानले जाते. कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. परंतु मंडपामध्ये उभी असलेली मूर्ती, नृत्य करून इत्यादी आसनांमध्ये स्थापित असलेल्या मूर्तीची स्थापना करता येते.

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ

मूर्तीसमोर या गोष्टी असणे आवश्यक

गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतो. तर उंदीर हे त्याचे वाहन आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना मूर्तीसोबत मोदक आणि उंदीर असणे आवश्यक मानले जाते. या प्रकारची मूर्ती घरी आणणे खूप चांगले मानले जाते.

मूर्तीचा रंग

गणपतीची मूर्ती खरेदी करताना तिच्या रंगाकडे लक्ष दिले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार, घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणणे सर्वात शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणल्याने सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते. पांढऱ्या रंगांच्या मूर्तीसोबत सिंदूर रंगांची मूर्ती देखील करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविकास होतो. तसेच गणपतीची मूर्ती चतुर्थीच्या आधी शुभ मुहूर्तावर घरी आणावी त्यामुळे शुभ फळ मिळतात, असे म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Ganesh chaturthi 2025 do not make these mistakes while bringing ganpati bappa idol home vastu rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • vastu news
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Dustbin Direction as Per Vastu : चुकूनही घरात या ठिकाणी कचऱ्याचा डबा ठेवू नका, लक्ष्मी होईल नाराज…!
1

Dustbin Direction as Per Vastu : चुकूनही घरात या ठिकाणी कचऱ्याचा डबा ठेवू नका, लक्ष्मी होईल नाराज…!

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर
2

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर
3

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.