
Diwali 2026 Vastu Tips: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी म्हटली की लक्ष्मीपूजन आलंच. या दिवशी सगळे जण देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात. कारण आपल्या संसाराचा सगळा भार तिच्याच कृपेने चालतो. लक्ष्मी प्रसन्न असेल तर सण साजरा करायला कोणाकडे हात पसरायची गरज पडत नाही. Diwali 2026 Vastu Tips:
आपली संस्कृती पण तेच सांगते, एवढे कमवा की गरजूला मदत करता येईल. म्हणूनच दिवाळीला आपण लक्ष्मीची सेवा करतो. पण लक्ष्मीपूजन झाल्यावर एक छोटासा उपाय केला तर घरात बरकत राहते असं जुने लोक सांगतात. त्यासाठी फक्त दालचिनी पावडर लागते.
हा उपाय करायला फार काही लागणार नाही. फक्त पाव चमचा बारीक दालचिनी पावडर घ्या.
लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी पूजा पूर्ण झाल्यावर करा. घराचा मुख्य दरवाजा उघडा करा. दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर उभे राहा आणि तोंड घराच्या आत करून उभे राहा.
पाव चमचा दालचिनी पावडर उजव्या हाताच्या तळव्यावर घ्या. डोळे बंद करा आणि मनात लक्ष्मी मातेचं नाव घ्या. तुमच्या मनात जे काही आहे, घरात पैसा येऊ दे, धंदा वाढू दे, कर्ज फिटू दे, जे काही इच्छा असेल ती मनातल्या मनात देवीला सांगा. लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा.
आता पूर्ण श्रद्धेने त्या पावडरवर फुंकर मारा. अशी फुंकर मारा की ती पावडर उडून घराच्या आत जाईल, जमिनीवर पडेल.
ती पावडर त्या रात्री तशीच राहू द्या. त्यावर झाडू मारू नका, पाय लावू नका. रात्रभर ती घरातच राहू द्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती पावडर एका कागदावर किंवा फडक्याने हळूच गोळा करा. चुकूनही कचऱ्यात फेकू नका. बाहेर झाडाच्या कुंडीत किंवा निर्माल्यात टाकून द्या.
जुन्या मान्यतेनुसार दालचिनीमध्ये पैसा आणि चांगली एनर्जी खेचून आणण्याची ताकद असते. हा उपाय केला तर अडकलेले पैसे परत मिळतात, धंद्यात वाढ होते, घरातली पैशाची चणचण दूर होते असं मानतात.तळहातावरून घरात उडणारी दालचिनी म्हणजे जणू लक्ष्मीचंच घरात स्वागत केल्यासारखं असतं, असा विश्वास आहे.
यंदा 2026 मध्ये दिवाळीचा मोठा योग आहे. रविवार, 8 नोव्हेंबर 2026 ला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आलं आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबरच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्यावर हा उपाय नक्की करा.
हा उपाय फक्त दिवाळीलाच करायचा असं नाही. दर महिन्याला जी अमावस्या येते, तिच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पण तुम्ही हा उपाय करू शकता. त्यामुळे घरात कायम सकारात्मकता राहते आणि पैशाची आवक चालू राहते असं सांगितलं जातं.फक्त एक चमचा दालचिनी, पण मनापासून केला तर नक्की फरक पडेल.
Ans: लक्ष्मीपूजनाची संध्याकाळची पूजा पूर्ण झाल्यानंतर हा उपाय करावा.
Ans: पाव चमचा बारीक दालचिनी पावडर घ्यावी.
Ans: मुख्य दरवाजाबाहेर उभे राहून तोंड घराच्या आत करून फुंकर मारावी.